⚡सावंतवाडी ता.०३-: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा ‘एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क’ या संस्थेकडून शैक्षणिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल ही संस्था, संस्थेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांच्या कारकिर्दीखाली यशस्वीरीत्या कार्यरत आहे. या संस्थेने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने जो प्रयत्न केला त्याच प्रयत्नांना आज भरभरून यश प्राप्त झाले. हा पुरस्कार शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांना मुंबई येथे देऊन गौरविण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रात अनेक संस्था कार्यरत आहेत तरीदेखील, शैक्षणिक विकासाचा दर्जा व प्रगती पाहून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल या संस्थेला ‘ इमर्जिंग हिरो अवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी, शिक्षकांचा पाठिंबा तसेच पालकांचेही शुभाशीर्वाद व त्यांची साथ मिळाल्यामुळे आपल्याला हा पुरस्कार प्राप्त झाला असे शाळेचे संचालक श्री रुजुल पाटणकर यांनी आपले विचार मांडून सर्वांचे आभार व्यक्त केले.
