⚡कणकवली ता.०३-: येथील सिंधुदुर्ग अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ प्रज्ञा परब यांची आज महिला प्रदेशाध्यक्ष सौ रुपाली चाकणकर यांनी नियुक्ती केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना आज मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालयात नियुक्ती पत्र प्रदान केले.
यावेळी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा मा. नगरसेवक अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कूड़ाळकर, राष्ट्रवादी नेते एम. के.गावड़े, राष्ट्रवादी जिल्हासरचीटनीस सावलाराम अनावकर, प्रांतिक सदयस्य दिलीप वर्णे, कुडाळ राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष पूजा पेड़नेकर,राष्ट्रवादी देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान, राष्ट्रवादी कुडाळ तालुका अध्यक्ष आर. के. सावंत, राष्ट्रवादी ओ. बी. सी. जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे,जिल्हा प्रतिनिधि केदार खोत राष्ट्रवादी जेष्ट नेते मनोहर साटम,राष्ट्रवादी नेते अविनाश चमणकर,आदी उपस्थित होते.
