बांदा/प्रतिनिधी
शेर्ले येथील अजय आरोसकर यांनी ओवी फौंडेशनच्या माध्यमातून आपले वडील (कै.) नामदेव आरोसकर व (कै.) अर्चना तुकाराम भोगटे यांच्या स्मरणार्थ पणदूर येथील सविता आश्रमला जीवनावश्यक साहित्य देऊन सहकार्य केले.
आरोसकर कुयुबीयांनी पितृपक्षात साहित्य देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तांदूळ, नारळ, कांदा, बटाटा, चवळी, सफेद वाटाणे, हिरवे वाटाणे, मसूर, तूरडाळ, चणाडाळ, गुळ, बिस्कीट यासंह खाऊचे साहित्य दिले. त्यांच्या दातृत्वाबद्दल आश्रमचे सचिव संदीप परब यांनी आभार व्यक्त केलेत.
