⚡वेंगुर्ला ता.०३-: रोटरी अंतर्गत कम्युनिटी डेव्हलपमेंट महिन्याचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुका क्रीडा केंद्राचे मार्गदर्शक व ज्येष्ठ कबड्डीपटू जयवंत चुडनाईक यांना रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन, रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व कबड्डी खेळाडू यांच्यामार्फत गौरविण्यात आले.
श्री.चुडनाईक हे क्रीडा क्षेत्रात कबड्डी, मैदानी खेळ व इतर खेळांतील खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यांचा विकास घडविण्यासाठी गेली ३० वर्षे महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गौरव करण्यात आला. यावेळी क्लबचे प्रेसिडेंट शंकर वजराटकर, व्हाईस प्रेसिडेंट अॅड.प्रथमेश नाईक, सेक्रेटरी योगेश नाईक, इव्हेंट चेअरमन युथ डायरेक्टर मृणाल परब, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी पिएसएस राजेश घाटवळ, असिस्टंट गव्हर्नर संजय पुनाळेकर, सचिन गावडे, क्लब डायरेक्टर मुकुल सातार्डेकर, आनंद बोवलेकर, रोटरॅक्ट झोनल रिप्रेझेन्टेटिव्ह प्रितेश लाड, प्रेसिडेंट पल्लवी भोगटे, कबड्डी खेळाडू अपूर्वा परब, निकिता निनावे आदी उपस्थित होते.
क्रीडा मार्गदर्शक जयवंत चुडनाईक यांचा सत्कार
