वेंगुर्ला प्रतिनिधी- गणित अध्यापक मंडळ सिंधुदुर्ग आयोजित गणित संबोध परीक्षा २०२३ संपन्न झाली. यात दाभोली इंग्लिश स्कूलच्या बसलेल्या बाराही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
समिधा पवार व हर्षदा मांजरेकर ह्या विशेष श्रेणीमध्ये, सृष्टी गोलतकर, संजवी सरमळकर, पल्लवी प्रभूदेसाई, तेजस्वी माडये, मिहिर दाभोलकर यांनी प्रथम श्रेणी तर उर्वरित पाच विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना गणित शिक्षक वसंत पवार, रेश्मा चोडणकर, दिपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधिर गोलतकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष खानोलकर यांनी अभिनंदन केले आहे.
फोटोओळी – गणित संबोध परीक्षेत दाभोली इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
