⚡वैभववाडी ता.०३-: नाधवडे येथील पर्यटकांना अधिक आकर्षित करणारा उंमाळा (बारमाई वाहणारा झरा) यांची स्वच्छता श्रमदानातून करण्यात आली.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त ही मोहीम राबविण्यात आली.यावेळी माजी जि.प. सदस्य सुधिर नकाशे, माजी उपसभापती दिगंबर मांजरेकर, नाधवडे गावचे सरपंच सौ शैलजा मनोहर सुतार, उपसरपंच श्री. श्रीरंग महादेव पावसकर, ग्रा.प. सदस्य श्री सर्यकांत कांबळे, रोहीत पावसकर, गोपाळ कोकाटे, ग्रामस्थ श्री संतोष पेडणेकर, आबा सुतार, संदिप यादव, संतोष यादव, ग्रा. प . कर्मचारी, युवक वर्ग,अंगणवाडी सेविका आशा सेविका व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
