देवबाग हायस्कूलला ग्रामपंचायतीकडून लॅपटॉप व प्रोजेक्टर प्रदान.

⚡मालवण ता.०३-: देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल या प्रशालेला देवबाग ग्रामपंचायततर्फे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त लॅपटॉप व प्रोजेक्टर प्रदान करण्यात आला.

यापूर्वी देवबाग ग्रामपंचायतकडून १५ व्या वित्त आयोगा मधील तरतुदीनुसार डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कुलसाठी एक संगणक संच प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी सरपंच उल्हास तांडेल यांनी प्रशालेसाठी एक लॅपटॉप आणि एक प्रोजेक्टर दि. २ ऑक्टोबर रोजी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सरपंच उल्हास तांडेल यांनी हे आश्वासन पूर्ण करत उद्योजक व माजी सैनिक राजन कुमठेकर यांच्या हस्ते प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.रचना रुपेश खोबरेकर यांच्याकडे लॅपटॉप व प्रोजेक्टर सुपूर्द करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी सरपंच उल्हास तांडेल, उपसरपंच ताता बिलये, ग्रामपंचायत सदस्य हेमंत बांदेकर, अण्णा केळुसकर, पोलीस पाटील व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास येरागी, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. राऊळ, सहदेव साळगावकर, रामा चोपडेकर तसेच विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सौ. राऊळ, जयेश राऊळ, दादा सातोस्कर यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page