Headlines

जिजामाता चौक येथे साडेसात लाखांचा पकडला गुटखा…

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई:दोघांना केली अटक.. ओरोस ता १गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील ओरोस जिजामाता चौक येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सात लाख ५३ हजार ९८० रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आज ताब्यात घेतला. याप्रकरणी गाडी चालक अभय नारायण केसरकर वय ४३ रा. बांदा काळसेवाडी आणि महादेव सुभाष नेवगी वय ३३ रा इन्सुली डोबवाडी…

Read More

ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात डेंग्यूचे ३१४ रुग्ण…

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तसकर यांची माहिती:मलेरिया आणि चिकनगूनियाचे सुद्धा रुग्ण मिळाले.. ओरोस ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात साथ रोगाने कहर केला आहे. ३१४ डेंग्यूचे रुग्ण मिळाले असून १९ मलेरिया रुग्ण मिळाले आहेत. तर चिकनगुणीयाचे ३० रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तसकर यांनी दिली. मात्र, सुदैवाने एकही मृत्यू झाला…

Read More

जिल्ह्यात आजपासून आयुष्मान भव मोहिमेला प्रारंभ…

चार महिने चालणार मोहीम: डॉ सई धुरी यांची माहिती ओरोस ता.०१-:केंद्र शासनाच्या आयुष्मान भव मोहिमेला जिल्ह्यात आजपासून प्रारंभ झाला आहे. ही मोहीम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत चार महिने चालणार आहे. या कालावधीत शिल्लक राहिलेल्या नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरण करण्यासाठी आयुष्मान आपल्यादारी, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी आदी मोहीम राबविण्यात येणार आहेत….

Read More

सुषमा मांजरेकर यांचा राज्यात डंका…

सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार होणार प्रदान ⚡सावंतवाडी ता.०१-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर (गोडकर )यांनी राज्यात डंका निर्माण केला आहे.महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार…

Read More

देवगडात पाणी समस्येबाबत नागरिकांतून संताप…

शहरात पाणी समस्येचा नागरिकांना करावा लागतो सामना, आठवड्याने होते पाणी पुरवठा.. देवगडदेवगड शहरात होत असलेल्या खंडित पाणीपुरवठा हा सुमारे ७ ते ८ दिवस खंडित करून केला जात असल्याने देवगड शहरवासीयांना पाहण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मध्यतरीच्या काळात हा पाणी पुरवठ्या ३ ते ४ दिवसांनी होत होता.सद्यस्थिती पुरेसा पाऊस होऊन देखील भीषण पाणी समस्येला नागरिकांना तोंड…

Read More

भोसले नॉलेज सिटी येथे लोकशाही जीवन प्रणाली आणि शिक्षण परिसंवादाचे आयोजन…

शिक्षक दिन पाच सप्टेंबर रोजी राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे आयोजन सावंतवाडी ता.०१-: शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचे दुसरे पालक, या शिक्षकांप्रति आदर-प्रेम दर्शवण्यासाठी शाळा-महविद्यालयांतून दरवर्षी ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. भावी पिढीला घडवण्याची, तिला लोकशाही-साक्षर करण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते, हे लक्षात घेऊन यंदा राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने भोसले नॉलेज…

Read More

भाजप महिला मोर्चाने पोलिसांना बांधल्या राख्या

⚡सावंतवाडी ता.०१-: भाजप महिला मोर्चा सावंतवाडी तर्फे सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांना रक्षाबंधन कार्यक्रमतसेच वृक्ष संवर्धन म्हणून झाडाला राखी बांधण्यात आली. यावेळी मा. नगरसेविका दिपाली भालेकर, मा. नगरसेविका उत्कर्षां सांसोलकर, सविता टोपले, मेघना साळगावकर, मिसबा शेख, साक्षी गवस आदी उपस्थित होते.

Read More

माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या पुढाकारातून आज आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती शिबीराचे आयोजन

⚡मालवण ता.०१-:भाजपचे माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांच्या पुढाकारातून वायरी येथे श्री. लुडबे यांच्या निवासस्थानी उद्या शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नवीन आधारकार्ड नोंदणी, ५ वर्षांनंतर, १५ वर्षांनंतरचे लहान मुलांची अपडेट, आधारचा फोटो बदलणे, नाव, पत्ता, जन्मतारीख,…

Read More

धार्मिक सलोखा कायम ठेवा

पोलिस निरीक्षक अरुण पवार यांचे शांतता समितीच्या बैठकीत आवाहन ⚡दोडामार्ग ता.०१-:अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद सण एकाच दिवशी येत असल्याने सण उत्सव काळात धार्मिक सलोखा कायम ठेवा असे आवाहन पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.येथील पोलिस ठाण्यात गुरुवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना दिल्या.यावर्षी…

Read More

नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे मध्ये रंगली संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धा

⚡कुडाळ ता.०१-: कणकवलीआदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे मध्ये संस्कृत दिनाचे औचित्य साधून संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन संस्कृत विभाग प्रमुख ओंकार अनंत गाडगीळ यांनी केले होते. या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला जवळजवळ ७० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. पहिला…

Read More
You cannot copy content of this page