Headlines

मालवण व देवगड येथे मासेमारी नौकांसाठी पर्यायी इंधनाच्या चाचण्या यशस्वी

⚡मालवण ता.२२-:मच्छीमाराचा इंधनावरील खर्च कमी व्हावा यासाठी एलपीजी म्हणजेच गॅसवर चालणाऱ्या नौका इंजिनाची (आऊट बोट मशीन) चाचणी नुकतीच मत्स्य व्यवसाय विभागाकडून मालवण व देवगड या ठिकाणी घेण्यात आली. या दोन्ही चाचण्या अतिशय यशस्वी झाल्या असून लवकरच सद्यस्थितीत वापरत असलेल्या पेट्रोल अथवा केरोसीन इंजिनाचे रूपांतर एलपीजी तसेच सीएनजी मध्ये करण्यासाठीचे तंत्रज्ञान सर्वसामान्य मच्छीमाराला कमीत कमी किमतीत…

Read More

अन्यथा परप्रांतीयांना मनसे स्टाईलने पोलीस ठाण्यात हजर करू…

विशाल ओटवणेकर:प्रशासनाने परप्रांतीय व्यक्तीची नोंद ठेवण्याची गरज.. ⚡मालवण ता.२२-:मालवण शहरात परप्रांतीय लोंढे वाढत असून या परप्रांतीयांना जे कोणी मालवणात आणत आहेत त्यांनी मालवण पोलीस ठाण्यात त्यांची माहिती देणे आवश्यक आहे. मालवण पोलीस ठाण्यात नोंद नसलेले कोणी परप्रांतीय शहरात सापडून आल्यास त्यांना मनसे स्टाईलने पोलीस ठाण्यात हजर केले जाईल, असा इशारा मनसेचे माजी मालवण शहराध्यक्ष विशाल…

Read More

विशाल परब यांच सावंतवाडीत थोड्याच वेळात होणार जंगी स्वागत…

प्रदेश उपाध्यक्ष निवडीच औचित्य; शहर भाजपचं आयोजन ⚡सावंतवाडी ता.२२-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी विशाल परब यांची नियुक्ती झाल्याबद्दल थोड्याच वेळात त्यांचा सावंतवाडी गवळी तिठा व भाजप कार्यालयात शहर भाजपच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

Read More

स्वस्त वाटू उपक्रम न राबविण्यामागे वाळू माफियांचे कनेक्शन …

महसुल अधिकाऱ्यांची मलई बंद होणार म्हणून जाणून बुजून हरताळ ; प्रसाद गावडे यांचा आरोप.. ⚡कुडाळ ता.२२-: राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात “स्वस्त वाळू डेपो ” उपक्रम राबवून जनतेला 600 रुपये दरात वाळू उपलब्ध करून देण्याचे धोरण जाहीर केले, मात्र जिल्ह्यातील महसूलचेच अधिकारी “मलई” बंद होण्याच्या भीतीने त्या धोरणाला जाणीवपूर्वक हरताळ फासण्याचे काम…

Read More

राजन तेली यांनी घेतले सातेरी मंदिरात देवीचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२२-: नवरात्रीच्या निमित्ताने आज माजगांव सातेरी मंदिर मध्ये माजी आमदार आणि भाजपा चे नेते मा.राजन तेली यांनी सातेरी देवीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी महाप्रसाद देखील लाभ घेतला. यावेळी माजी पं. स. सदस्य बाबू सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद सावंत तसेच गावप्रमुख आर के सावंत ,कमिटी सदस्य विजय माधव, भाऊ घाडी, मंगेश राठवड, रामदास भोगण,…

Read More

सिंधुदुर्गात ५ डिसेंबर ते २४ डिसेंबर कालावधीत वीज ग्राहक मेळावे…

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत निर्णय ⚡कुडाळ ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची बैठक कुडाळ येथे पार पडली. या बैठकीमध्ये तालुका पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील तालुका कार्यकारिणींना मान्यता देणे, वीज ग्राहकांचा आढावा, वीज ग्राहकांचा एकत्रित मेळावा सर्व १० उपविभागांमध्ये घेण्याबाबत निर्णय घेण्यात आले….

Read More

समाजातील प्रत्येक घटकाने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सहभागी व्हावे:रवींद्र खानविलकर

⚡कणकवली ता.२२-: देव व धर्माला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध नाही. मात्र, देव व धर्माच्या नावाखाली शोषण व लुबाडणाऱ्यांविरोधात आमच्या संघटनेचा लढा सुरु आहे. समाजातल्या अथश्रद्धा प्रबोधनाद्वारे दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि माणुसकीपूर्ण, स्वातंत्र्य, समता, बंधुता मानणारा व स्वीकारणारा आनंदी समाज निर्माण करणे हे समितीचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने अंधश्रद्धा…

Read More

भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी विशाल परब यांची नियुक्ती…

सावंतवाडी ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवा नेते श्री विशाल परब यांची कामाची दखल घेत त्यांना भारतीय जनता पार्टीने भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना नुकताच प्राप्त झाल असून त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्रासह जिल्ह्यातून त्यांचं अभिनंदन होत आहे.

Read More

जाणवली येथे आरोग्यविषयक मार्गदर्शन…

⚡कणकवली ता.२२-: शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दिक्षा पार्क जानवली येथे स्त्रियांच्या आरोग्यावर मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कणकवली येथील डॉ.शमीका बिरमोळे यांनी यावेळी स्त्रियांना स्त्रियांचे विविध आजार व उपचार यांविषयी मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित स्त्रियांची स्तनांच्या कर्करोगाची पूर्वनिदान शारीरिक तपासणी करून त्यांना कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप सुद्धा त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित…

Read More

मळगाव येथील शारदा विद्यालय प्राथमिक शाळेत सरस्वती पूजन उत्साहात…

इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांच्या स्नेहसंमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद… ⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ-: मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री देवी सरस्वती पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यनिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम सादर करण्यात आला. याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री देवी सरस्वती पूजनानिमित्त सकाळी पुरोहिताच्या साक्षीने श्री देवी शारदा…

Read More
You cannot copy content of this page