⚡सावंतवाडी ता.२२-: नवरात्रीच्या निमित्ताने आज माजगांव सातेरी मंदिर मध्ये माजी आमदार आणि भाजपा चे नेते मा.राजन तेली यांनी सातेरी देवीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी महाप्रसाद देखील लाभ घेतला.
यावेळी माजी पं. स. सदस्य बाबू सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद सावंत तसेच गावप्रमुख आर के सावंत ,कमिटी सदस्य विजय माधव, भाऊ घाडी, मंगेश राठवड, रामदास भोगण, अजय सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.
