अन्यथा परप्रांतीयांना मनसे स्टाईलने पोलीस ठाण्यात हजर करू…

विशाल ओटवणेकर:प्रशासनाने परप्रांतीय व्यक्तीची नोंद ठेवण्याची गरज..

⚡मालवण ता.२२-:
मालवण शहरात परप्रांतीय लोंढे वाढत असून या परप्रांतीयांना जे कोणी मालवणात आणत आहेत त्यांनी मालवण पोलीस ठाण्यात त्यांची माहिती देणे आवश्यक आहे. मालवण पोलीस ठाण्यात नोंद नसलेले कोणी परप्रांतीय शहरात सापडून आल्यास त्यांना मनसे स्टाईलने पोलीस ठाण्यात हजर केले जाईल, असा इशारा मनसेचे माजी मालवण शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून दिला आहे.

मालवण शहरात परप्रांतीय लोंढे वाढत आहेत. कामानिमित्त या परप्रांतीय व्यक्तींना मालवणात आणले जाते. परराज्यातून या व्यक्तींना आणून देखील त्यांची कोणतीही नोंद ठेवली जात नाही. याबाबत प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. येथील प्रत्येक परप्रांतीय व्यक्तीची नोंद पोलीस स्थानकात असलीच पाहिजे, अशी भूमिका विशाल ओटवणेकर यांनी मांडली आहे.

You cannot copy content of this page