इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांच्या स्नेहसंमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ-: मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री देवी सरस्वती पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यनिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम सादर करण्यात आला. याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
श्री देवी सरस्वती पूजनानिमित्त सकाळी पुरोहिताच्या साक्षीने श्री देवी शारदा आवाहन पूजन त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. गावातील लोकांनी उपस्थिती दर्शवत श्री देवी सरस्वतीचे दर्शन घेतले. सायंकाळी 4 वाजल्यापासून मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरु झाले. ईशस्तवन, स्वागतगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. लावणी गीत, कोळी गीत, रेकॉर्ड डान्स, पोवाडा, नक्कल, नाटिका, देशभक्तीपर गीत आदी विविध प्रकारचे अविष्कार यावेळी मुलांनी सादर केले. याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर शिक्षक, पालक मुलांचे गरबा नृत्य पार पडले.
रात्री महिलांनी देवीसमोर फुगडी नृत्य सादर केले. गावातील भजन मंडळानी देवीसमोर भजन सादर केले. आज सकाळी श्री देवी सरस्वतीचे वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांचा गावातील ग्रामस्थांनी लाभ घेतला.
