Headlines

कुडाळ छ. शिवाजी महाराजनगरातील कचराप्रश्र्नी नगरसेवक अभिषेक गावडे ऑनफील्ड…

रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्यांनासुनावले खडेबोल:पुन्हा कचरा टाकल्यास संबंधितावर होणार कारवाई.. ⚡कुडाळ ता.२३-: कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. ५ छत्रपती शिवाजी महाराजनगर येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. याबाबत स्थानिक भाजप नगरसेवक अभिषेक गावडे यांनी कुडाळ नगरपंचायतच्या कचरा सफाई विभागाशी संपर्क साधून येथील कचरा ताबडतोब बाजूला केला.कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. ५ छत्रपती शिवाजी महाराजनगर हा भाग बाजारपेठ…

Read More

वायरी गर्देरोड महापुरुष मंदिर रामगीताने भक्तिमय…

श्रीराम मंदिर प्रतिष्ठापन निमित्त करण्यात आले होते आयोजन.. मालवण दि प्रतिनिधी अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. याच पार्शवभूमीवर वायरी गर्देरोड येथील महापुरुष मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच राम गीतांनी वातावरण भक्तिमय बनले. सायंकाळी दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. येथील महापुरुष मित्रमंडळ वायरी गर्देरोड युवक मंडळ,…

Read More

शासनाने ‘ आश्वासन ‘ दिलेल्याचा जी आर काढताच आंदोलन मागे…

आशा, गटप्रवर्तक यांचे तहसीलदारांना निवेदन.. मालवण दि प्रतिनिधीदोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने आशा व गटप्रवर्तकांना वाढीव मानधन तसेच दरवर्षी दोन हजार रुपये दिवाळी भेट देण्याचे लेखी आश्वासन दिलेले असताना याबाबत शासनाने शासन निर्णय जाहीर न केल्याने आपल्या मागण्यापासून आशा तसेच गटप्रवर्तकांना वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याबाबत त्वरित शासन निर्णय जाहीर करावा यासाठी राज्यभरातील…

Read More

जिल्ह्यात ९,३४९ नवीन मतदारांची प्रारूप यादीत भर…

२३,९१६ मतदारांना वगळले:जिल्हाधिकारी किशोर तावडे ⚡ओरोस ता.२३-: १ जानेवारी २०२४ च्या अहर्ता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत ९ हजार ३४९ मतदारांची नव्याने भर पडली आहे. तर मयत, स्थलांतरित होणे, या कारणाने २३ हजार ९१६ मतदार वगळण्यात आले आहेत. यामुळे ६ लाख ५७ हजार ७७१ एवढे मतदार प्रारूप मतदार यादीत निश्चित झाले आहेत. विशेष…

Read More

सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ‘स्वानंदी मेळावा’ संपन्न…

⚡बांदा ता.२३-: धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेच्या सर्व शाळातून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ‘स्वानंदी मेळावा’ येथील आनंदी मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी १०० हून अधिक शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते.मेळाव्याचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक अन्वर खान, सरोज देसाई, दादा सावंत, गणेश गर्दे, बी….

Read More

मालवण ज्येष्ठ नागरिक संघाची २६ रोजी बैठक…

⚡मालवण ता.२३-: ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉन संलग्न), मालवणची मासिक बैठक २६ जानेवारी रोजी सकाळी १० वा. येथील हॉटेल लिलांजली, भरड येथे होणार आहे. बैठकीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन, ७५ वर्षे पूर्ण झालेल्या तीन सदस्यांचा सत्कार तसेच चंद्रकांत गोखले यांचे मार्गदर्शन होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर यांनी केले आहे.

Read More

तारकर्लीतील स्वामी समर्थ मठात २८ पासून कार्यक्रम…

⚡मालवण ता.२३-: तारकर्ली येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या १९ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त २८ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुका अक्कलकोट येथून तारकर्ली येथे येणार आहेत. दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ७ वा. श्री मूर्तीवर अभिषेक, ८.३० वा. श्री दत्त मंदिर, वायरी बांध…

Read More

अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी…

⚡कणकवली ता.२३-: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने, माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचेवतीने जयंती साजरी करण्यात आली.जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांचे संकल्पनेतून, अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाच्या येथे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, सल्लागार सुनिल काणेकर यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली…

Read More

आमदार नितेश राणे यांचा वैभववाडीत ठाकरे सेनेला जोरदार दणका…

नगरसेवक ,माजी नगराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल.. ⚡कणकवली ता.२३-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वैभववाडीत भाजप आम.नितेश राणे यांनी जोरदार दणका दिला आहे. वैभववाडी नगरपंचायत नगरसेविका दर्शना पवार, माजी नगराध्यक्षा दीपा गजोबार,माजीनगराध्यक्ष संजय चव्हाण यांच्यासह शकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.कणकवली येथे आमदार नितेश राणे यांच्या निवासस्थानी हा प्रवेश कार्यक्रम पार पडला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read More

मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रीराम प्रतिमा पूजन…

प्रभु रामचंद्रांच्या जीवनावरील ठराविक प्रसंगाचे चित्र प्रदर्शन.. ⚡सावंतवाडी ता.२३सहदेव राऊळ-: अयोध्या येथील श्रीराम मंदिर उदघाटन व मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर मळगाव येथील इतिहास प्रेमी ज्ञानेश्वर राणे यांनी आपल्या निवासस्थानी आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्रीराम प्रतिमा पूजन केले. यावेळी त्यांनी प्रभु रामचंद्रांच्या प्रतिमेसोबत प्रभु रामचंद्रांच्या जीवनावरील ठराविक प्रसंगाचे चित्र प्रदर्शन मांडले होते. यात रामजन्मापासून, रामाचे बालपण, श्रीराम व…

Read More
You cannot copy content of this page