अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी…

⚡कणकवली ता.२३-: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने, माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचेवतीने जयंती साजरी करण्यात आली.
जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांचे संकल्पनेतून, अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाच्या येथे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, सल्लागार सुनिल काणेकर यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली व मोत्याचा हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.या जयंतीचे औचित्य साधून व्यापारी मित्र मंडळाच्या जेष्ठ सदस्यांचा सन्मान करण्यात आला.

सल्लागार सुनिल काणेकर यांच्या हस्ते भगवान कासले यांचा, परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थानचे सेवक श्रीरंग पारगावकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. लक्ष्मण महाडीक यांचा अविनाश गावडे,प्रसाद उगवेकर, प्रभाकर कदम, बाबुराव घाडिगावकर, सईद नाईक, हेमंत नाडकर्णी, सचिन कुवळेकर, विशाल रजपूत , प्रसाद पाताडे , सर्फराज शेख, आदी सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला, या जयंती निमित्ताने व्यापारी मित्र मंडळाचे सदस्य भगवान कासले , लक्ष्मण महाडीक यांचा सन्मान केला, असे प्रतिपादन केले, याप्रसंगी पेडणेकर यांच्या सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते, सर्वानीच पुष्पांजली अर्पण करून वंदन केले.

You cannot copy content of this page