प्रभु रामचंद्रांच्या जीवनावरील ठराविक प्रसंगाचे चित्र प्रदर्शन..
⚡सावंतवाडी ता.२३सहदेव राऊळ-: अयोध्या येथील श्रीराम मंदिर उदघाटन व मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर मळगाव येथील इतिहास प्रेमी ज्ञानेश्वर राणे यांनी आपल्या निवासस्थानी आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्रीराम प्रतिमा पूजन केले. यावेळी त्यांनी प्रभु रामचंद्रांच्या प्रतिमेसोबत प्रभु रामचंद्रांच्या जीवनावरील ठराविक प्रसंगाचे चित्र प्रदर्शन मांडले होते.
यात रामजन्मापासून, रामाचे बालपण, श्रीराम व सीता विवाह सोहळा, वनवास, सीता हरण, राम हनुमान भेट, लंका दहन, रावण वध आदी अनेक चित्रांच्या संग्रहाचे प्रदर्शन लावण्यात आले होते. मळगावातील ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवत दर्शनाचा व प्रदर्शनाचा लाभ घेतला. ज्ञानेश्वर राणे हे इतिहास वेडे असून ते आपल्या निवासस्थानी शिवजयंतीही साजरी करतात. यात ते शिवाजी महाराजांवरील विविध पुस्तके, शिवचरित्र, शिवकालीन पत्रे, नाणी आदींचे प्रदर्शन लावत असतात.
