सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ‘स्वानंदी मेळावा’ संपन्न…

⚡बांदा ता.२३-: धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेच्या सर्व शाळातून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ‘स्वानंदी मेळावा’ येथील आनंदी मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी १०० हून अधिक शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते.
मेळाव्याचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक अन्वर खान, सरोज देसाई, दादा सावंत, गणेश गर्दे, बी. एस. नाईक, श्री कणबरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात ज्यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलीत अशा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात अन्वर खान, भालचंद्र नाईक, गणेश गर्दे, गीता गर्दे, एन. डी. गवस, विजय तोरसकर, सरोज देसाई, टी. व्ही. देसाई, डी. जी. गोवेकर, रामकृष्ण पेळपकर, माधव कणबरकर, सगुण (दादा) सावंत आणि विलास गिरप यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत मालवणकर यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश पाणदरे यांनी तर आभार एम. डी. मोरबाळे यांनी मानले. हा स्वानंदी मेळावा पार पाडण्यासाठी गुरुनाथ नार्वेकर, कमलाकर धुरी, प्रेमानंद नाडकर्णी, प्रभाकर तेली, सदाशिव गवस, अन्वर खान, उत्तम देसाई, सुधीर बांदेकर आणि व्ही. बी. करमळकर यांनी परिश्रम घेतलेत.

You cannot copy content of this page