आयुष्यमान भारत योजनेत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात आघाडीवर…

योजनेचे राज्यप्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी दिली माहिती.. सिंधुदुर्गनगरी ता १६आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम कौतुकास्पद असे आहे. सर्व यंत्रणेने अतिशय सक्षमपणे काम केल्याने हा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. आतापर्यंत ६० टक्के आयुष्यमान कार्ड वितरित झाली आहेत. उर्वरित राहिलेली कार्ड आंगणेवाडी व कुणकेश्वर जत्रेमध्ये कॅम्प घेऊन वितरित करण्याच्या तसेच ३ मार्च रोजी होणाऱ्या पोलिओ…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी प्रशासन कटिबद्ध…

मंदार हाडके: जिल्ह्यातील ४० पेक्षा जास्त व्यवसायिकांनी यामध्ये सहभाग.. ⚡मालवण ता.१६-: केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे मत पर्यटन मंत्रालय प्रकल्प समन्वयक मंदार हाडके यांनी तोंडवळी येथे बोलताना केले. केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील ५८ जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग…

Read More

मानसीश्वर जत्रौत्सव १७ रोजी…

⚡वेंगुर्ला ता.१६-: उभादांडा येथील प्रसिद्ध श्री मानसीश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.

Read More

रोणापाल येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या…?

⚡बांदा ता.१६-: रोणापाल – आरोसकर टेंब येथील विश्राम गोविंद पालव (३०) या तरुणाने राहत्या घराच्या वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. बांदा पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read More

सावंतवाडीत प्रथमच शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ प्रतिकृती आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन…

अर्चना फाऊंडेशनच्यावतीने १८ ते २० फेब्रुवारी कालावधीत आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१६-: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या संकल्पनेतून अर्चना फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगभरातील अस्सल दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृती आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे सिंधुदुर्गवासीयांना पाहण्यासाठी १८ ते २० फेब्रुवारी कालावधीत आयोजित केले आहे.हे प्रदर्शन रोज…

Read More

पाडलोसमध्ये पाढे पाठांतर स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव…

⚡बांदा ता.१६-: पाडलोस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 1 मध्ये तिन्ही शाळातील मुलांच्या पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिली ते चौथी गटातील वर्गवार पहिल्या तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधीर गावडे यांनी रोख रक्कम स्वरूपात पारितोषिक वितरित केले. यावेळी तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Read More

सावंतवाडीत आज सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन…

अर्चना घारे यांचे सौजन्य: शहरातील महिलांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन.. सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी शरद पवार गटाच्या वतीने आज सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत येथील मीना ग्रुप हायस्कूल जवळील अर्चना घारे परम यांच्या संपर्क कार्यालयात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांच्या सौजन्याने आयोजित केला…

Read More

प्रवीण भोसले यांचा सर्व पक्षियांच्या उपस्थितीत ७५ वा वाढदिवस होणार साजरा…

१९ फेब्रुवारी रोजी प्रवीण भाई मित्रमंडळाने केले आहे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१६-: राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रवीण भाई भोसले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त प्रवीण भाई मित्र मंडळाच्या वतीने सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत 19 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता आर पी डी येथील हॉलमध्ये वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रवीणभाई मित्र मंडळाच्या वतीने आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात…

Read More

रसायनशास्त्राचा वापर पर्यावरणाच्या हितासाठी करा…

युवराज लखमराजे भोंसले:विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करिअरच्या विविध संधी मिळवण्यासाठी करावा.. ⚡सावंतवाडी ता.१६-: श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत केमोत्सव 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते झाले.उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आणि मुंबई विद्यापीठ सिनेट…

Read More

मालवण तालुक्यातील देवबाग डिंगेवाडी येथे घराला आग…

सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान:आग विजविताना तरुण जखमी.. ⚡मालवण ता.१५-:मालवण तालुक्यातील देवबाग डिंगेवाडी येथील रामचंद्र मधुसूदन सामंत यांच्या घराला आज भल्या पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले या आगीत घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, तांबा, पितळीची भांडी, धान्य, कपडेलत्ते आणि इतर चिज वस्तू आगीत जळून भस्मसात झाल्याने…

Read More
You cannot copy content of this page