कणकवलीत 10 मे पासून फणस प्रक्रिया प्रशिक्षण…

⚡कणकवली ता.०४-: संकल्प प्रतिष्ठानतर्फे 10 ते 12 मे या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत कणकवली येथे प्रात्यक्षिकावर आधारित फणस प्रक्रिया प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात तज्ज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पल्प, पोळी, हलबा, गरे पावडर, फणस कणी, बिस्किटं, समोसा, भजी, कटलेट, लोणचं, जॅम, स्क्वॅश, सिरप, फणस पुरणपोळी, चॉकलेट, आईस्क्रिम यांच्यासह अन्य पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होणार्‍यांनी नाव नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी करता (9145428338) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page