सावंतवाडी
येथील विठ्ठल रुक्माई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद माजी शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना पाठिंबा दर्शविला आहे.त्यांनी यासंदर्भात नुकतीच श्री राणे यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.
लक्ष्मण देऊळकर, प्रकाश सावंत, नारायण कारिवडेकर, अजय सावंत, संतोष हरमलकर, भालचंद्र राऊळ, सुधीर नाईक, प्रकाश जाधव, सागर सावंत, भरत गंगावणे, बाळकृष्ण नाईक, संतोष नाईक आदी उपस्थित होते.
