⚡मालवण ता.०४-:
कांदळगाव येथे राणे (कांदळगाव) कुलदेवता मंदिर त्रैवार्षिक सोहळा ५ व ६ मे रोजी होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन श्री शिवप्रेरणा राणेवाडा (कांदळगाव) रहिवासी सेवा संघ, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष विनायक राणे यांच्या अध्यक्षतेखाली श्री देव रामेश्वर मंदिर परिसरात हा सोहळा पार पडेल.
यानिमित्त दि. ५ रोजी सकाळी ८.३० वाजता कांदळगाव (महापुरुष) येथून दिंडी, सामुदायिक लघुरुद्र, अभिषेक, नामस्मरण व तीर्थप्रसाद, रात्री ७ वाजता महिलांचा डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. ६ मे रोजी सकाळी ८.३० वाजता कुलदेवतेची सामुदायिक पूजा-अर्चा, होमहवन, अभिषेक, आरती, महाप्रसाद, दुपारी ३ वाजत हळदीकुंकू, भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव सुरेश राणे यांनी केले.
