Headlines

हरकुळ बु., हळवल गावातील नुकसानग्रस्त भागाची आम. नीतेश राणेंकडून पाहणी…

⚡कणकवली ता.२१-: तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा हरकुळ बु. व हळवल गावाला बसला होता. परिणामी याठिकाणच्या अनेक घरांची पडझड झाली होती. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंगळवारी आमदार नीतेश राणे यांनी केली. पाहणीदरम्यान राणेंनी आपद्गस्त कुटुंबांची भेट घेतली. या आपद्गस्तांना तातडीची मदत म्हणून कौले व पत्रे व अन्य साहित्य पाठवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार…

Read More

आचरेकर प्रतिष्ठान येथे आज कृष्ण विवरचा प्रयोग…

दर्पण प्रबोधिनी संस्थेतर्फे नाटकाचीनिर्मिती.. ⚡कणकवली ता.२१-: अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित व दर्पण प्रबोधिनीनिर्मित कृष्ण विवर या प्रायोगिक नाटकाचा पहिला प्रयोग येथील वसंतराव आचेरकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात बुधवार सायंकाळी 7.30 वा. होणार आहे. हे नाटक मानवी भावनांचे कंगोरे उघडणारे असून प्रक्षेकांसाठी वैचारिक मेजवानी ठरेल, असा विश्वास दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांनी व्यक्त केला. कणकवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार…

Read More

बारावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मंत्री दिपक केसरकर यांनी केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२१-: बारावी परीक्षेत यावर्षीही कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कोकणच्या यशवंत विद्यार्थ्यांच अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, बारावीच्या परिक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत असं यश संपादन केलं आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. सातत्याने महाराष्ट्रात…

Read More

कणकवली तालुक्याचा बारावीचा 98.17 टक्के निकाल…

परेश मडव याने पटकावला तालुक्यात प्रथम येण्याचा मान. ⚡कणकवली ता.२१-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा मंगळवारी दुपारी 1 वाजता अाॅनलाईन निकाल जाहीर केला. कणकवली तालुक्याचा 98.17 टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेसाठी 2025 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1988 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कणकवली ज्यु. काॅलेजच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी परेश सतीश मडव…

Read More

कोकणचा मान आमच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वाढवत राहावा…

विशाल परब:बारावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन.. ⚡सावंतवाडी ता.२१-: राज्यात परत एकदा कोकण पॅटर्न म्हणून कोकण विभागातले सगळे विद्यार्थी व विद्यार्थिनी एक नंबरवर आल्याबद्दल मी मनापासून त्यांचे विशेष अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने कोकणचा मान आमच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वाढवत राहावा, अशा शुभेच्छा भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिल्या. दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

Read More

आंबोली सैनिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलजेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

⚡सावंतवाडी ता.२१-: आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ (विज्ञान) च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेने सलग १४ व्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून २२ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणीत तर उर्वरीत सर्व १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीण झाले आहेत. यामध्ये शाळेमधून कॅडेट अॅलेक्स अविनाश सावंत याने…

Read More

उपजिल्हा रुग्णालयाला खा. राऊतांची भेट…

⚡कणकवली ता.२१-: उपजिल्हा रुग्णालयाला खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, विलास गुडेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात देवगड, मालवण, वैभववाडीसह अन्य तालुक्यातील रुग्ण…

Read More

बारावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आम. नीतेश राणे यांनी केले अभिनंदन…

⚡कणकवली ता.२१-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा मंगळवारी दुपारी 1 वाजता अाॅनलाईन निकाल जाहीर केला. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आमदार नीतेश राणे यांनी अभिनंदन केले. राज्यात परत एकदा कोकण पॅटर्न म्हणून कोकण विभागातले सगळे विद्यार्थी व विद्यार्थिनी एक नंबरवर आल्याबद्दल मी मनापासून त्यांचे विशेष अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने कोकणचा मान…

Read More

आरोस विद्या विहार मधून तेजल शेळके प्रथम…

⚡सावंतवाडी ता.२१-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा बारावीचा निकाल ८५ टक्के लागला आहे. प्रशालेतून तेजल धोंडू शेळके ७८.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. सोनाली संजय नाईक ७२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर संजना चंद्रकांत आरोसकर ६७.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. सर्व यशस्वी…

Read More

कणकवली तालुका काॅंग्रेसकडून राजीव गांधींना अभिवादन…

कणकवली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली तालुका राष्ट्रीय काॅग्रेसतर्फे अभिवादन केले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, उपाध्यक्ष प्रदीपकुमार जाधव, सरचिटणीस प्रवीण वरुणकर, संजय राणे, विनायक मेस्त्री, शहराध्यक्ष अजय मोरये, महेश तेली, आयशा सय्यद, कमलाकर तांबे, गजानन मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले. यावेळी…

Read More
You cannot copy content of this page