Headlines

आचरेकर प्रतिष्ठान येथे आज कृष्ण विवरचा प्रयोग…

दर्पण प्रबोधिनी संस्थेतर्फे नाटकाचीनिर्मिती..

⚡कणकवली ता.२१-: अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित व दर्पण प्रबोधिनीनिर्मित कृष्ण विवर या प्रायोगिक नाटकाचा पहिला प्रयोग येथील वसंतराव आचेरकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात बुधवार सायंकाळी 7.30 वा. होणार आहे. हे नाटक मानवी भावनांचे कंगोरे उघडणारे असून प्रक्षेकांसाठी वैचारिक मेजवानी ठरेल, असा विश्वास दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांनी व्यक्त केला.


कणकवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. झुंजारराव बोलत होते. यावेळी अभिनेता नीलेश पवार, प्रणाली चव्हाण, राजू करंजेकर, दर्पणचे अध्यक्ष आनंद तांबे, किशोर कदम, महेंद्र कदम आदी उपस्थित होते.
झुंजार म्हणाले, कृष्ण विवर हे नाटक मानवी भावभावनांच्या संबंधांचे कांगोरे उगडणारे आहे. आधुनिक युगात मानवाच्या भावभावनांमध्ये अमुलाग्रह बदल झाला आहे. बदलेल्या भावभावांना या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. कणकवलीतील रसिक हे नाट्यप्रेमी आहे. त्यामुळे हे नाटक त्यांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृष्ण विवराचे लेखन बौद्धिक मेजवानी देणारे असून सुंदर नाट्यानुभव व मानवी भावभावनांची परस्पर वागणूक आणि संबंधांचे अनेक कंगोरे तपासायला भाग पाडायला लावणारे आहेत.
किशोर कदम म्हणाले, दर्पण प्रबोधिनी फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी संघटना आहे. संघटनेच्या आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. संस्थेने आता नाट्य क्षेत्रात पाऊल ठेऊन कृष्ण विवर या नाटकाचीनिर्मिती केली असून या नाटकाचा पहिला प्रयोग आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात होणार आहे. तरी नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दर्पण प्रबोधिनीतर्फे करण्यात आले.

You cannot copy content of this page