उपजिल्हा रुग्णालयाला खा. राऊतांची भेट…

⚡कणकवली ता.२१-: उपजिल्हा रुग्णालयाला खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, विलास गुडेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


कणकवली उपजिल्हा रुग्णालयात देवगड, मालवण, वैभववाडीसह अन्य तालुक्यातील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. मात्र, सध्या रुग्णालयात तज्ज्ञ डाॅक्टरांची कमतरता आहे. डाॅक्टरांअभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. या संदर्भात आपण जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यांना आचारसंहितेचे कारण दाखवून रुग्णांना मारायचं काम करून करा, अशी सूचना आपण केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक श्री. पाटील यांच्याशी राऊत यांनी चर्चा केली.

You cannot copy content of this page