बारावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आम. नीतेश राणे यांनी केले अभिनंदन…

⚡कणकवली ता.२१-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा मंगळवारी दुपारी 1 वाजता अाॅनलाईन निकाल जाहीर केला. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आमदार नीतेश राणे यांनी अभिनंदन केले. राज्यात परत एकदा कोकण पॅटर्न म्हणून कोकण विभागातले सगळे विद्यार्थी व विद्यार्थिनी एक नंबरवर आल्याबद्दल मी मनापासून त्यांचे विशेष अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने कोकणचा मान आमच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वाढवत राहावा, अशा शुभेच्छा राणे यांनी दिल्या.

You cannot copy content of this page