भाजपाच्या युवा मोर्चा सावंतवाडी अध्यक्षपदी संतोष राऊळ…

वेंगुर्ल्याची जबाबदारी प्रविण वायंगणकरांकडे.. सावंतवाडी,ता.०४: येथील भाजपाच्या युवा मोर्चा पदाधिकार्‍यांची निवड आज जाहीर करण्यात आली. यात आंबोली मंडल अध्यक्षपदी कोलगाव सरपंच संतोष राऊळ, तर वेंगुर्ला मंडल अध्यक्षपदी प्रणव वायंगणकर यांची निवड करण्यात आली आहे.

Read More

बांदा प्रभाग क्रमांक पाच मधील ठाकरे सेनेच्या ग्रामपंचायत सदस्या सौ. देवल येडवे यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡बांदा ता.०४-: बांदा शहर ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक पाच मधील शिवसेना (ठाकरे गटाच्या) ग्रामपंचायत सदस्या सौ. देवल येडवे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. बांदा ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता असलेल्या भाजपचे संख्याबळ हे आता तेरा झाले आहे. शिवसेना शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांच्या प्रभागातून त्या निवडून आल्याने त्यांच्यासाठी हा…

Read More

नांदगाववासिय आणि राणे कुटुंबीय यांचे अतुट नाते…

आम.नितेश राणे:नांदगाव नमो चषक शुटींग बॉल स्पर्धेत मनेराजुरी संघ विजेता,.. ⚡कणकवली ता.०४-: नांदगाव आणि राणे कुटुंब यांचे एक दृढ नाते आहे. ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यापासून चालत आलेली ही नात्याची परंपरा मी पुढेही चालू ठेवत आलो आहे. राजकारण आणि समाजकारणात काम करत असताना नांदगावचा विकास येथील प्रत्येक व्यक्तीचा विकास निस्वार्थपणे करत राहीन. आमदार,…

Read More

राष्ट्रीय शुटींग बाॅल स्पर्धेचे उद्घाटन सोहळा संपन्न…

⚡वैभववाडी ता.०४-: ग्रामसेवा क्रिडा मंडळ उंबर्डे व वैभववाडी तालुका शुटींग बाॅल असोसिएशन वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 15 वी भव्य राष्ट्रीय शुटींग बाॅल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईणकर उपनगराध्यक्ष संजय सावंत, अरविंद रावराणे, अध्यक्ष एस एम बोबडे, महेश रावराणे, केळकर सर, मारुती मोहिते, पाटील सर शैलेश परब, संजय महाडिक,…

Read More

वैभववाडीत वीज वितरण कंपनीच्या वतीने जनजागृती प्रभाग फेरी…

⚡वैभववाडी ता.०४-: ऊर्जा वाचवा देश वाचवा आपण आपल्या छोट्या छोट्या कृती मधून ऊर्जा वाचू शकतो अशा घोषणा देत वैभववाडी शहरांमध्ये विद्युत सुरक्षित वापर करावा व लाईनमेन दिवस असल्याने वीज वितरण कंपनीच्या वतीने जनजागृती प्रभाग फेरी काढण्यात आली. यावेळी उपकार्यकारी अभियंता निलेश पाटील कनिष्ठ अभियंता अमोल घाडगे कनिष्ठ सहायक अभियंता राजाराम माने तुषार गावकर अमित नेर्लेकर,…

Read More

स्वप्निल पाटील यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित…

⚡वैभववाडी ता.०४-: तालुक्यातील श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे शाळेचे विज्ञान शिक्षक स्वप्निल श्रीकांत पाटील यांना अविष्कार फाउंडेशन इंडिया तर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‌‌संपूर्ण देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने राज्यातील विज्ञान शाखेत कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा आविष्कार फाउंडेशन मार्फत आयोजित करण्यात…

Read More

मसुरे येथील नेत्र चिकित्सा शिबिराचा १३० जणांना लाभ…

⚡मालवण ता.०४-: श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट, पेडणेकर बंधू मसुरे कावावाडी व विजय क्रीडा मंडळ मुंबई यांच्या वतीने मसुरे कावावाडी येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचा १३० जणांनी लाभ घेतला. १०४ जणांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन विजय क्रीडा मंडळ अध्यक्ष संतोष कासले यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्ट अध्यक्ष शरद…

Read More

मेढा राजकोट येथील ठाकरे गटाचे वार्ड पदाधिकारी लुईस रॉड्रिक्स यांसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡मालवण ता.०४-: मालवण शहर मेढा राजकोट येथील ठाकरे गटाचे वार्ड अध्यक्ष लुईस रॉड्रिक्स यांसह अनेक सहकाऱ्यांनी मालवणचे उद्योजक तथा शिवसेना युवा नेते सतीश आचरेकर, सहदेव बापर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेना नेते किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे. मेढा राजकोट येथील ठाकरे गटाचे वार्ड अध्यक्ष लुईस रॉड्रिक्स हे उद्धव…

Read More

डेगवे प्रशालेमध्ये “सिनर्जीया २०२४” या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.०४-: शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील अंतर्गत कौशल्यांचा विकास व्हावा तसेच शाळा, शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये परस्पर सहकार्य राहावे या हेतूने दिव्य ज्योती स्कूल डेगवे प्रशालेमध्ये “सिनर्जीया २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शाळेच्या मैदानावर खास पालकांसाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात…

Read More

पूजा सामंत यांना कै. यशवंती धोंडू पटेकर स्मृती पुरस्कार जाहीर…

⚡बांदा ता.०४-: मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालय यांच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा (कै.) यशवंती धोंडू पटेकर स्मृती पुरस्कार यावर्षी पुणे येथील डॉ. सौ. पूजा पराग सामंत यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक ९ रोजी सायंकाळी ४ वाजता वाचनालयच्या सभागृहात होणार आहे. यावेळी कोलगाव येथील निरामय केंद्राच्या संचालिका तथा…

Read More
You cannot copy content of this page