मविआच्या शिष्टमंडळाची पोलीस निरीक्षकांकडे मागणी..
कणकवली : सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या एका गावात मतदानासाठी पैसे वाटण्याच्या प्रकाराचा ‘व्हिडिओ’ व्हायरल झाला आहे. याबाबत उबाठा शिवसेनेच्या महिला पदाधिकारी माहिती घेण्यासाठी गेल्या असता त्यांना काहींनी दमदाटी करून अपमानास्पद वागणूक दिली. वरील दोन्ही प्रकारांबाबत आम्ही तक्रार अर्ज दिला आहे. त्या अनुषंगाने तपास करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांची भेट घेऊन केली. याबाबत तपास करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री. तडवी यांनी दिले.
यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, उबाठा शिवसेना पदाधिकारी माधवी दळवी, वैदेही गुडेकर, संजना कोलते, प्रतिभा अवसरे आदी उपस्थित होते.
