Headlines

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या कॉम्रेडस मॅरेथॉनसाठी भारतीय संघात दोन सिंधुपुत्रांची निवड…

ओंकार पराडकर व प्रसाद कोरगावकर यांची नेत्रदीपक कामगिरी..

⚡मालवण ता.२०-;
दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या जगप्रसिद्ध कॉम्रेडस मॅरेथॉन साठी जाणाऱ्या भारतीय संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील ओंकार पराडकर आणि कुडाळ मधील प्रसाद कोरगावकर या दोन सिंधू पुत्रांची निवड झाली आहे. हि मॅरेथॉन ९ जून रोजी दक्षिण आफ्रिका मधील डर्बन ते मेरिसबुर्ग या दोन शहरांमध्ये होणार आहे. या स्पर्धेत जगभरातून ३५००० धावक तर भारतातून ४०० धावक सहभागी होणार आहेत. शरीराच्या आणि मनाच्या क्षमतेची परीक्षा घेणाऱ्या या जगप्रसिद्ध स्पर्धेसाठी ओंकार पराडकर आणि प्रसाद कोरगावकर या दोघांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे ९० किलोमीटर अंतर तब्बल १२ तासांच्या आत पार करायचे असते. अत्यंत कठीण आणि चढण असलेला रास्ता एकूण १८०० मीटर उंच चढण धावकांना पार करायचे असते.
या स्पर्धेत सहभागी होण्या साठी धावकांना ४२.२ किलोमीटर अंतर ४ तासाच्या आत पार करावे लागते आणि नंतरच संघात निवड होते. प्रसाद कोरगावकर याने ४२.२ किलोमीटर अंतर ३ तासात आणि ओंकार पराडकर याने ४२.२ किलोमीटर अंतर ३ तास ५६ मिनिटात पार करून आपली भारतीय संघात निवड पक्की केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवणारे हे पहिले धावक आहेत.

कोकण सारख्या कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळाकडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून या दोघांनी यश संपादन केले आहे. यापुढे योग्य मार्गदर्शक मिळवून, उत्तम ट्रेनिंग देऊन देशाचे प्रतिनिधित्व कसे करता येईल या साठी सिंधू रनर्स टीम प्रयत्नशील आहे. प्रसाद व ओंकार यांनी विविध स्पर्धामध्ये यश मिळविले आहे. या स्पर्धेमध्ये उत्तम वेळेत ९० किलोमीटर अंतर पार करून देशासाठी मेडल आणण्याचे स्वप्न मनी बाळगून हे दोघेही ६ जून ला दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार आहेत.

You cannot copy content of this page