वामनाश्रम स्वामी यांचे 24 मे पासून जिल्ह्यात आर्शिवचन…

⚡कणकवली ता.२०-: वैश्यगुरु श्री श्री वामनाश्रम स्वामींच्या काशी येथील मूळ वैश्य कुल गुरुमठाच्या पुर्रनिर्माणासाठी वामनाश्रम स्वामी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातीत गावांत जाऊन आर्शिवचन व बैठका घेऊन गुरुमठाच्या पुर्रनिर्माणासाठी जनजागृती करणार आहेत. बैठकांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.


बुधवार 22 मे रोजी दोडामार्ग येथील मोहन मणेरीकर यांच्या घरी सायंकाळी 7 वा. आर्शिवचन फलमंत्राक्षता, चंद्रमौळीश्‍वर देवतांची पूजा होईल. गुरुवार 23 मे रोजी दुपारी 1 वा. घोडगेवाडी विठ्ठल मंदिर येथे आर्शिवचन फलमंत्राक्षता, संध्याकाळी 7 वा. सावंतवाडीत वैश्य भवन येथे आर्शिवचन फलमंत्राक्षता,
9 रमेश भाट यांच्या निवासस्थानी चंद्रमौळीश्वर देवतांची पूजा होईल.
शुक्रवार 24 मे रोजी दुपारी 3 आरोंदा येथील प्रदीप तानावडे यांच्या निवासस्थानी आर्शिवचन फलमंत्राक्षता, 7 वा. कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे चंद्रमौळीश्वर देवतांची पूजा होईल. शनिवार 25 मे रोजी दुपारी 12 वा. महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे आर्शिवचन फलमंत्राक्षता, संध्याकाळी 7 वा. वैश्य गुरूमठ उंडील येथे चंद्रमौळीश्वर देवतांची पूजा होईल. रविवार 26 मे रोजी वैश्य गुरू मठाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त दुपारी 12 वा. आर्शिवचन फलमंत्राक्षता, संध्या. 7 वा. चंद्रमौळीश्‍वर देवतांची पूजा होईल. या बैठकांना वैश्य सामजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वैश्य गुरुसेवा समिती, सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page