ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत दिया धुरीचे घवघवीत यश..

⚡वेंगुर्ला ता.०२-: ब्रेन डेव्हलपमेंट (बीडीएस) परीक्षेत मदर तेरेसा इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ले येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी दिया धुरी ही विद्यार्थिनीने इंग्रजी माध्यम मधून तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. ७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत दियाने १०० पैकी ८७ गुण मिळवुन तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला असून तिने ब्रँझ मेडल प्राप्त केले आहे. दियाला…

Read More

गडमठ गावठण येथे ४ एप्रिलला रक्तदान शिबिराचे आयोजन…

मोफत नेत्र तपासणी करीत मार्गदर्शन सुद्धा केले जाणार.. वैभववाडी प्रतिनिधीह्युमन राईटस् असोशिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली आणि एकदंत फुड ॲन्ड बेव्हरेजिस (ऑरबेलो) यांच्या संयुक्त विद्यमाने कै.सौ.शिला शंतनू बांदिवडेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गुरूवार दि. ४ एप्रिल २०२४ रोजी स.१० वा भव्य रक्तदान शिबीर व मोफत नेत्रतपासणी…

Read More

कट्टा प्राथमिक शाळेचा शतक उत्सव ७ एप्रिल पासून…

देवगडदेवगड तालुक्यातील कट्टा येथील प्राथमिक शाळेला १०० वर्षे पूर्ण होत असून या शाळेचा शताब्दी सोहळा सर्व माजी विद्यार्थ्यांसमवेत ७ व ८ एप्रिल २०२४ असे दोन दिवस साजरा होणार आहे त्यासाठी माजी विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था करण्यात येणार असून दोन दिवसांच्या या सोहळ्यात मान्यवरांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे, प्रदर्शन व मनोरंजन, विविधांगी कार्यक्रम सादर केले जाणार आहेत….

Read More

संविधानिक विचारमंच यांच्यावतीने 14 रोजी जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा…

देवगड(प्रतिनिधी)सांविधानिक विचारमंच देवगडच्‍या वतीने देवगड तहसिलदार कार्यालयाच्‍या नजिकच्‍या पटांगणात छ शिवाजी महाराज,महात्‍मा ज्‍योतिराव फुले आणि विश्‍वरत्‍न्‍ डॉ.बाबाहेब आंबेडकर १४ एप्रिलरोजी जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्‍ताने जिल्‍हास्‍तरीय खुली निबंध स्‍पर्धा आयोजीत करण्‍यात आली आहे. या निबंध स्‍पर्धेसाठी भारतीय संविधानाची ७५ वर्षे आणि स्‍त्रीजीवनाचे परिवर्तन, दि प्रॉब्‍लेम रूपीची १०० वर्षे आणि समाजाचे अर्थकारण, भारतीय संविधान…

Read More

जामसंडे विद्यामंदिर येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न…

नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत.. देवगड(प्रतिनिधी)आदर्श शाळा जोशी विद्यामंदिर जामसंडे येथे १एप्रिल रोजी येथे२०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सन २०१५-१६ पासून इयत्ता पाहिलीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. त्यामुळे या प्रशालेची पटसंख्या वर्षानुवर्षे वाढत आहे.सदर कार्यक्रमाणात मुलांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन…

Read More

आंबोली हिरण्यकेशी फाटा येथे दुचाकी इनोव्हा ला धडकली…

आंबोली,ता.१; हिरण्यकेशी फाटा येथे समोरून लाईट पडल्याने दुचाकी उभ्या असलेल्या इनोव्हा कार ला धडकली. दुचाकी स्वार मुळवंदवाडी येथील सहदेव परब हे जखमी झाले.चेहऱ्याला व छातीला दुखापत झाली आहे.त्यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.डॉ महेश जाधव डॉ.आदिती पाटकर यांनी उपचार केल्यानंतर सावंतवाडी रुग्णालयात नेण्यात आले.पोलिसांनी ही पाहणी केली.

Read More

शुभम धारगळकरचे एमबीबीएस परीक्षेत यश…

⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला-देऊळवाडा, सातेरी मंदिर नजिकचा रहिवासी शुभम श्रीधर धारगळकर याने किग एडवर्ड मेमोरीअल हॉस्पिटल आणि शेठ जी.एस. मेडिकल कॉलेज, मुंबई मधून वैद्यकीय क्षेत्रातील ‘एमबीबीएस‘ ही पदवी संपादन केली आहे.

Read More

सौरभ ताम्हणकर यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा मोफत शो…

⚡मालवण ता.०१-: भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्रवीर सावरकर’ हा चित्रपट सिने कलाकार रणदीप हुड्डा यांनी प्रकाशित केला आहे. मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपटाचा मोफत शो शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी…

Read More

मालवण बंदर जेटीवरील हायमास्ट बंद असल्याने नाराजी…

⚡मालवण ता.०१-: मालवण शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण असलेल्या मालवण बंदर जेटी येथील हायमास्ट टॉवर गेले काही महिने बंद असल्याने रात्रौच्या वेळी जेटी परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. बंदर जेटी परिसरात पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. त्यामुळे या बंद हायमास्ट बाबत मालवण नगरपालिकेचे लक्ष वेधूनही हायमास्ट प्रकाशमान करण्याबाबत कोणतीही कार्यवाही नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत नसल्याचे सांगत…

Read More

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात डॉ. शंकर मोडक व्याख्यानमाला संपन्न….

⚡मालवण ता.०१-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात मराठी अर्थशास्त्र परिषद व स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय – अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शंकर मोडक व्याख्यानमाला संपन्न झाली. यामध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनंत लोखंडे यांनी ‘महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेची सद्यस्थिती आणि आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करत महाराष्ट्रातील जमीन, रेल्वे, हवाई…

Read More
You cannot copy content of this page