जिल्हा रुग्णलयातर्फे रक्तदात्यांचा सन्मान…

⚡कुडाळ ता.१४-: सर्वांचे रक्त एकच तर आहे… सर्वधर्मीयांचे… एकाच रंगाचे… कोणताही जातीभेद न करता प्राण वाचवणारे हे रक्त! आजच्या जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून 50 किंवा त्याहून जास्त वेळा रक्तदान करणाऱ्या दात्यांचा जिल्हा रुग्णालय आणि रक्तपेढीच्या वतीने सत्कार करण्यात आला.


आज १४ जुन २०२४ रोजी जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकवेळा (५० किंवा अधिक वेळा) रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा गौरव सन्मानपत्र देऊन जिल्हा रुग्णालय आणि रक्तपेढी च्या वतीने करण्यात आला. १०० पेक्षा अधिक वेळा रक्तदान केलेले दाते देखील आपल्या जिल्ह्यात आहेत. दुर्मिळ गटाचे राखीव रक्तदाते देखील निस्पृह भावनेने रक्तदान करीत असतात. या रक्तदात्याना सन्मानित करण्यात आले.
यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान या संस्थेचाही सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मनोगतामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी संस्थेबद्दल धावता आढावा घेत, संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल माहीती दिली. रक्तदात्यांना धन्यवाद देत, रक्तपेढीच्या सहकार्याबद्दलही माहिती दिली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी मनोगतामध्ये सिंधु प्रतिष्ठान व सर्व रक्तदात्यांचे आभार मानले, प्रतिष्ठानच्या सहकार्यामूळे रुग्णसेवा सुलभ झाल्याचे ते मनोगतात म्हणाले. यावेळी विचारमंचावर डॉ. श्रीम. गवंडळकर, डॉ. शिवाजी बिरारे (पॅथाॅलॉजीस्ट), डॉ.अमित अवाळे (BTO) तसेच रक्तपेढी व रुग्णालयीन कर्मचारीवृंद व मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.

You cannot copy content of this page