⚡बांदा ता.१४-: लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचे सावंतवाडी भाजपचे विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी बांदा येथे स्वागत केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी,सुधिर आडीवरेकर दिलीप भालेकर,प्रमोद कामत,आदी उपस्थित होते.