उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ आणि सहकाऱ्यांनी केले रुग्णांना फळ वाटप..
⚡सावंतवाडी ता.१४-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवस दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या औचित्याने मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ आणि सहकाऱ्यांनी मनसे नेते पक्ष निरीक्षक संदिप दळवी आणि गजानन राणे यांच्या मार्गदर्शनात रूग्णालयातील रुग्णांना फळवाटप केले. यावेळी रुग्णांनी आम्ही सर्व राज ठाकरेंच्या पाठीशी आहोत त्यांना आमचा आशिर्वाद आहे, असे सांगत मनसे सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी मनसे विभाग अध्यक्ष राकेश परब, साईल तळकटकर, शतायु जांभळे, विशाल राऊळ, चिंतामणी देसाई आदी उपस्थित होते.