Headlines

रस्ता ओलांडताना अज्ञात दुचाकी स्वराने धडक दिल्याने आठ वर्षीय मुलगा जखमी…

कोलगाव येथील घटना: पोलीस घटनास्थळी दाखल ⚡सावंतवाडी ता.१२-: रस्ता ओलांडताना अज्ञात दुचाकी स्वाराने धडक दिल्याने आठ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. यावेळी गंभीर जखमी मुलाला नागरिकांनी धाव घेत त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान घटनास्थळी देखील पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.

Read More

पळसंब येथे चिऱ्यांनी भरलेला ट्रक शेतात पलटून शेतीचे नुकसान…!

⚡मालवण ता.१२-:मालवण तालुक्यातील पळसंब – बुधवळे रस्त्यावर गोवा-२ प्रकल्पाच्या समोरील रस्त्यावर चिरे वाहतूक करणारा सोळा चाकी ट्रक रस्त्याच्या साईडपट्टी वरून लगतच्या शेतात पलटी झाल्याची घटना काल रात्री घडली. सुदैवाने वाहन चालक बचावला असला तरी ट्रक शेतीत पलटी झाल्याने नाचणी, कणगी शेतीचे नुकसान झाले. याबाबतची माहिती ग्रामस्थांना समजताच पळसंब सरपंच, उपसरपंच, माजी सरपंचासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव…

Read More

कट्टा महात्मागांधी तंटामुक्त गाव सामिती अध्यक्षपदी दयानंद शेडगे यांची पुन्हा बिनविरोध निवड…

⚡देवगड ता.१२-:देवगड तालुक्यातील कट्टा गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी श्री दयानंद लवू शेडगे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करणेत आली. कट्टा ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली या ग्रामसभेत त्यांची बिनविरोध सर्वानुमती निवड करण्यात आली.यावेळी सरपंच श्रीम. श्वेता कोयंडे, ग्रामसेविका श्रद्धा वळंजू, ऊपसरपंच गणेश करंगुटकरसदस्या सौ तेजस्विनी शेडगे,सौ स्वरा करंगुटकर,सौ प्रतिक्षा शेडगे,सौ मनाली मेकर,…

Read More

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जामसंडे मोरेश्वर गोगटे हायस्कूलची सलग दुसऱ्या वर्षीही जिल्हास्तरावर निवड…

⚡देवगड ता.१२-: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ या अभियानात श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर, जामसंडे या प्रशालेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ अभियानांतर्गत स्पर्धेत माध्यमिक गटातून श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे या प्रशालेने सलग दुसऱ्या वर्षीही तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.शाळेचे मूल्यांकन शिक्षण खात्यातील वरिष्ठ…

Read More

राजघराण्याच्या आशीर्वादाने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी-:राजू मसुरकर…

⚡सावंतवाडी ता.१२-: अनेक वर्षे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. राजघराण्याने गोरगरीब जनतेसाठी आरोग्य सेवा मिळावी यासाठी रुग्णालयात असलेली तीन एकर जमीन पैकी दीड एकर जमीन मोफत देण्यात आली असून श्रीमंत खेमराज सावंत भोसले यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी मार्फत सह्या करून मोफत जमीन देण्यात आली असून राज घराण्याची युवराणी भोगले (सावंत भोसले) यांची लवकरच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कागदपत्रांवर…

Read More

गणेशोत्सवात गॅस धारकांची अडवणूक झाल्यास आंदोलन…

युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांचा इशारा.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचे वातावरण आहे.  उत्सवाच्या निमित्ताने महिला वर्गाची स्वयंपाक घरात लगबग सुरू असून गॅस वितरण यंत्रणा मात्र गॅस धारकांना वेठीस धरत आहेत.  तांत्रिक कारणामुळे गॅस धारकांची अडवणूक करण्यात येत असून किमान गणपतीच्या काळात तरी ही अडवणूक थांबवावी आणि गणेश भक्तांना दिलासा…

Read More

ग्रामसभेच्या जनजागृतीसाठी ग्रामस्थांकडून “मळगाव जोडो” अभियान…!

⚡सावंतवाडी ता.१२-: ग्रामसभेचे गावाच्या विकासात महत्त्वाचे योगदान असते. हे तळागाळातील लोकांचा आवाज स्पष्ट करण्याचे एक माध्यम आहे, यासाठी गावात ग्रामसभेची जनजागृती व्हावी व जास्तीत जास्त लोकांनी ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून आपले प्रश्न ग्रामपंचायत समोर मांडावे या हेतूने मळगावातील नागरीकांनी आज मळगाव ग्रामपंचायत कार्यालयात एकञितपणे येत बैठकीचे आयोजन केले होते, यात गावातील नागरीकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची चर्चा…

Read More

आरक्षण व संविधान संपवणार असे वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधी यांचा निषेध…

⚡कणकवली ता.१२-: कॉग्रेसचे राहुल गांधी यानी अमेरिकेच्या दौऱ्यावर एका मुलाखतीत काँग्रेस सत्तेवर आल्यावर भारतातील आरक्षण व संविधान संपवणार या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ कणकवली भाजपा तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी तळेरे एस. टी बस स्थानकासमोर समोर काँग्रेस हटाव.. देश बचाव.. महाविकास आघाडी हटाव.. महाराष्ट्र बचाव.. राहूल गांधी मुर्दाबात अशा घोषणा देत…

Read More

साक्षी भोगटे हीच लॉ एडवोकेट परीक्षेमध्ये घवघवीत यश…!

⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थिनी कु.साक्षी भोगटे हिने लॉ एडवोकेट या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलं. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कुमारी साक्षी ही सावंतवाडी येथील माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची कन्या आहे.

Read More

पाच दिवसाच्या गणपती बाप्पांना मालवणात भक्तिमय वातावरणात निरोप…

⚡मालवण ता.११-: गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या, एक,दोन, तीन, चार…गणपतीचा जयजयकार अशा घोषणा आणि साथीला वाद्यांचा गजर तसेच फटाक्यांची आतिषबाजीत आज बुधवारी पाच दिवसाच्या गणपती बाप्पांना मालवणात भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. कोकणचा महाउत्सव म्हणून ओळखल्या जाणऱ्या गणेशोत्सवाच्या आजच्या पाचव्या दिवशी सायंकाळी प्रथे परंपरे नुसार गणेशमूर्ती विसर्जनास सुरुवात झाली. विसर्जन ठिकाणी नगर पालिका, ग्रामपंचायत…

Read More
You cannot copy content of this page