कोलगाव येथील घटना: पोलीस घटनास्थळी दाखल
⚡सावंतवाडी ता.१२-: रस्ता ओलांडताना अज्ञात दुचाकी स्वाराने धडक दिल्याने आठ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. यावेळी गंभीर जखमी मुलाला नागरिकांनी धाव घेत त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान घटनास्थळी देखील पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.
