⚡सावंतवाडी ता.१२-: ग्रामसभेचे गावाच्या विकासात महत्त्वाचे योगदान असते. हे तळागाळातील लोकांचा आवाज स्पष्ट करण्याचे एक माध्यम आहे, यासाठी गावात ग्रामसभेची जनजागृती व्हावी व जास्तीत जास्त लोकांनी ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून आपले प्रश्न ग्रामपंचायत समोर मांडावे या हेतूने मळगावातील नागरीकांनी आज मळगाव ग्रामपंचायत कार्यालयात एकञितपणे येत बैठकीचे आयोजन केले होते, यात गावातील नागरीकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची चर्चा करून ती ग्रामसभेत जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊन मांडावी यासाठी संपूर्ण गावात फिरुन प्रत्येक घरी जाऊन घरातील व्यक्तींनी ग्रामसभेत येण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.
यासाठी आज ग्रामस्थांनी वाडीनुसार प्रमुख प्रतिनीधींची नेमणूक करण्यात आली..
या अभियानाची सुरुवात येत्या शनिवारपासून रवळनाथ मंदीर येथून करण्यात येईल अशी माहिती मळगाव ग्रामस्थांच्या बैठकीत देण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.पांडूरंग राऊळ, गुरुनाथ गावकर, महेंद्र पेडणेकर, गणेशप्रसाद पेडणेकर, ॲड. निधी दाभोलकर, बाप्पा नाटेकर सह गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…
