Headlines

तळवड्यात भाजपतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

विशाल परब, संदीप गावडे व गौरव मुळीक यांच्या उपस्थितीत उपक्रम; शाळांच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार..

⚡सावंतवाडी ता.०६-: भारतीय जनता पक्षाच्या वतीने तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक १, २ व ४ तसेच श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथील विद्यार्थ्यांना या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
भाजप युवा नेते विशाल परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे आणि उपसभापती गौरव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास हातभार लावणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
यावेळी संदीप गावडे आणि गौरव मुळीक यांनी तळवडे जिल्हा परिषद शाळांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे येथील जिल्हा परिषद शाळा अधिक सक्षम आणि आदर्श बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते पंकज पेडणेकर (माजी सभापती), दादा परब (ग्रामपंचायत सदस्य), बाळू साळगावकर (आंबोली मंडळ सरचिटणीस), शंकर सावंत (शक्ती केंद्र प्रमुख), केतन आजगावकर, धीरेंद्र मापसेकर, सिद्धीश तेंडोलकर, ज्ञानेश्वर गोडकर, रवींद्र परब, सुशांत गावडे, संदीप परब, शाम शेतकर, सचिन परब, वासुदेव जाधव, प्रवीण लोके, विकास गावडे आदी उपस्थित होते.उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी स्वागत करत भारतीय जनता पक्षाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

You cannot copy content of this page