देवगड (प्रतिनिधी)
देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नवीन संचालक मंडळाची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी रोटेरियन अनुश्री पारकर, सचिवपदी रोटेरियन दयानंद पाटील तर खजिनदारपदी रोटेरियन अनिल गांधी यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी रोटेरियन विजय बांदिवडेकर, सार्जंट ॲट आर्म्स रोटेरियन मनस्वी घारे, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी रोटेरियन गौरव पारकर, संयुक्त खजिनदार रोटेरियन अनिल कोरगावकर, डायरेक्टर कम्युनिटी सर्व्हिस रोटेरियन रामाकांत आचरेकर, डायरेक्टर क्लब सर्व्हिस रोटेरियन नरेश दामरी, डायरेक्टर इंटरनॅशनल सर्व्हिस रोटेरियन राजेंद्र भुजबळ, डायरेक्टर न्यू जनरेशन रोटेरियन अशोक मुझुमले, डायरेक्टर पोलिओ प्लस रोटेरियन रुपेश पारकर, चेअरमन मेंबरशिप रोटेरियन रुपेश खोत, चेअरमन ॲडमिनिस्ट्रेशन रोटेरियन अनिकेत बांदिवडेकर, चेअरमन रोटरी फाउंडेशन रोटेरियन श्रीपाद पारकर, चेअरमन सर्व्हिस प्रोजेक्ट रोटेरियन मनीषा दामरी, चेअरमन पब्लिक इमेज रोटेरियन हनीफ मेमन, चेअरमन क्लब लिटरसी रोटेरियन प्रकाश गायकवाड, चेअरमन फेलोशिप रोटेरियन प्रवीण पोखळे, चेअरमन हिस्टोरियन रोटेरियन शामल पोखळे तसेच डायरेक्टर व्होकेशनल सर्व्हिस रोटेरियन महेश घारे ज्येष्ठ रोटरी एन एकनाथ तेली यांची निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मंगळवार, दि. ८ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता देवगड येथील इंद्रप्रस्थ सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या सोहळ्यास रोटरीचे पदाधिकारी, विविध रोटरी क्लबचे सदस्य, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती क्लबतर्फे देण्यात आली आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष अनुश्री पारकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक सेवा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, युवक सक्षमीकरण तसेच विविध लोकहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, देवगड तालुक्यात रोटरीच्या सेवाभावी कार्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला आहे.
