Headlines

ग्रामस्थांच्या तत्परतेने हटविले रस्त्यातील झाड; बांदा-डेगवे मार्गावरील वाहतूक सुरळीत…

⚡बांदा ता.०६-: बांदा-डेगवे मुख्य रस्त्यावरील डेगवे-भयकान येथे आज दुपारी अतिवृष्टीने झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. साहिल देसाई, नारायण देसाई, श्रावण देसाई, सिद्धांत देसाई, मधुकर देसाई आणि सलिल देसाई यांनी एकत्रितपणे झाड तोडून रस्त्याच्या बाजूला हटविले. त्यामुळे अल्पावधीतच वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला असून वाहनचालकांनी त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले. पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडत असल्याने धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page