Headlines

मळगाव रेल्वे फाटक येथील गतिरोधकांची उंची कमी करा…

*हेमंत मराठे यांची सा बां विभागकडे मागणी..

⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी मळगाव रेल्वे फाटक निरवडे मार्गावर असलेल्या गतिरोधकांची उंची प्रमाणापेक्षा जास्त असल्याने ती तात्काळ कमी करावी अशी मागणी मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागकडे केली आहे.
सावंतवाडी मळगाव रेल्वे फाटक निरवडे मार्गावर सार्वजनिक बांधकामांकडून मोठ्या प्रमाणात गतिरोधक घालण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी या मार्गावरून मोठ्या प्रमाणात लोह खनिज ची डंपरने वाहतूक होत असल्याने अपघात होऊ नये यासाठी सदरचे गतिरोधक घातले होते. यावेळी सदरचा रस्ता हा काही अंशी डांबरीकरण तर काही अशी मातीचा होता. यामुळे या मार्गावरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या डंपर व्यतिरिक्त इतर वाहने फारच तुरळक येत होती. मात्र आता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागने डांबरीकरण केल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक वाढली आहे. या मार्गावर शेवटी पेक्षा जास्त उंचीचे घातलेले गतिरोधक वाहतुकीला खूपच त्रासदायक होत आहेत.प्रमाणापेक्षा गतीरोधकांची उंची जास्त असल्याने गाड्यांना खालून सदरचे गतिरोधक घासत असल्याने वाहनांचे नुकसान होत असल्याने वाहन चालकाना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.यामुळे सदर गतिरोधकांची उंची तात्काळ कमी करावी अशी मागणी मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर सदरच्या रस्त्याचा काही भाग हा स्थानिक शेतकऱ्यांचा मालकीचा असून सार्वजनिक बांधकाम विभाग कडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता खाजगी जागेतून रस्ता काढल्याने या मार्गावर काम करताना सदरचे शेतकरी त्यांना अटकाव करतात. याबाबतही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने संपादित करून घेतल्या आहेत त्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे अशी ही मागणी हेमंत मराठे यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कडे केली आहे. त्यांना जागेचा मोबदला मिळावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनकडे आपण निवेदन देऊन मागणी करत असल्याचे मराठे यांनी सांगितले. तसेच मळगाव बाजारपेठ येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील गतिरोधकाच्या दोन्ही बाजूला भले मोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.त्या ठिकाणी सदरचे खड्डे बुजवावून त्याठिकाणी असणाऱ्या गतिरोधकाची उंची कमी करून पांढरे पट्टे मारावेत अशी मागणी मराठे आणि केली आहे.

You cannot copy content of this page