Headlines

भर वस्तीत आलेल्या नागाला सर्पमित्रांकडून जीवदान…!

⚡कणकवली ता.१३-: कणकवली शहरातील सुतारवाडी येथे भर वस्तीत आलेल्या नागाला कलमठ येथील यश वर्दम या सर्पमित्र युवकाने शिताफिने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. सुतारवाडी येथील प्रतीक मेस्त्री यांच्या घरात सर्वजण गणपतीची आरती करण्याच्या तयारीत असताना भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अस्सल नाग घरानजीक आढळून आला. त्यानंतर घरातील कोणीतरी कलमठ येथील सर्पमित्र यश वर्दम यांना याबाबत कळविले….

Read More

आमदार नितेश राणे यांनी घेतले शिरगांवच्या राजाचे दर्शन…

७६ वर्षाची परंपरा असलेले देवगड तालुक्यातील एकमेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.. ⚡देवगड ता.१३-: कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील ७६ वर्षांची परंपरा असलेल्या एकमेव सार्वजनिक गणपती शिरगांवच्या राजाचे शुक्रवारी कृपाशिर्वाद घेतले. आमदार नितेश राणे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत शिरगांव बाजारपेठ येथे स्वागत करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने अध्यक्ष राजाराम साटम…

Read More

आरक्षण रद्द करणार म्हणणाऱ्या राहुल गांधी, आणि काँग्रेस चा खरा चेहेरा जनतेसमोर आला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी असेपर्यंत देशातील आरक्षणाला कोणीच हात लावू शकणार नाही:भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी घेतला काँग्रेस आणि गांधी यांचा समाचार.. कणकवली : राहुल गांधी आणि काँग्रेस यांचा आरक्षण विषयी खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. त्यांनी याच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या एनडीए च्या नेत्यांवर टीका केली. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत…

Read More

सावंतवाडी मतदारसंघात भाजपची संघटना मजबूत, त्यामुळे या मतदारसंघावर आम्ही दावा करणार…

प्रभाकर सावंत:संघटना मजबूत असल्याने इथे इच्छुकांची संख्या अधिक.. ⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपची संघटना मजबूत आहे त्यामुळे या मतदारसंघावर आम्ही आमचा दावा करणार आहोत आणि तसे आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मागणीही केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागांवर भाजपच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने प्रदेश कडून आम्हाला सुचित करण्यात आले आहे. मात्र पक्षश्रेष्ठी जे काही सांगतील…

Read More

मळगाव येथील राऊळ व गावकर घराण्यातील महिलांचा गौरी पूजन कार्यक्रम उत्साहात…

७५० वर्षांची परंपरा : सायंकाळी गौरीचे विसर्जन… ⚡सावंतवाडी ता.१३यसहदेव राऊळ-: चक्क ७५० वर्षांची परंपरा असलेल्या मळगाव येथील देवस्थानचे मानकरी असलेल्या राऊळ (कुळ) व गावकर (थळ) घराण्यातील सौभाग्यवती महिलांचा एक दिवसीय गौरी पूजन, व्हवसा कार्यक्रम गणेश चतुर्थीच्या सहाव्या दिवशी परंपरेनुसार उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सायंकाळी गौरीचे थाटात विसर्जन करण्यात आले.गणेश चतुर्थीप्रमाणे गौरी पूजनालाही तेवढेच…

Read More

आरक्षण रद्द करणार म्हणणाऱ्या राहुल गांधी,आणि काँग्रेस चा खरा चहरा जनते समोर आला…

प्रभाकर सावंत: राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणासंदर्भातील विधानाचा सिंधुदुर्ग भाजपकडून केला जाहीर निषेध.. ⚡सावंतवाडी ता.१३-: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणासंदर्भातील विधानाचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज इथे केली.दरम्यान देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे तोपर्यंत कोणीही आरक्षण या विषयाला हात लावू…

Read More

ती बैठक व्यापाऱ्यांच्या विनंतीवरून…

अर्चित पोकळे: विकासाला विरोध करण्याचं काम जनतेने नाकारलेल्या लोकांनी करू नये; बबन साळगावकरांना टोला… सावंतवाडी ता.१२-: नगरपालिकेत झालेली बैठक ही पूर्णपणे व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन होती. व्यापाऱ्यांच्या विनंतीवरून ती घेण्यात आली. यात व्यापाऱ्यांचे सर्व प्रश्न मांडण्याची मुभा मिळाली. गेल्या दहा वर्षात बबन साळगावकर यांना नगराध्यक्ष असताना दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेल्या इंदिरा गांधी व्यापारी संकुला…

Read More

सालईवाडा भागातील चोरट्याने तीन बंद फ्लॅट फोडले

⚡सावंतवाडी ता.१२-: येथील सालईवाडा भागातील चोरट्याने तीन बंद फ्लॅट फोडले. यात अंदाजे वीस हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाला असून अधिक तपास करत आहे.

Read More

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी सज्ज…

सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी शेकडो गाड्यांतून कोकणवासीय गावी आले होते. त्यांच्या परतीसाठी एसटी प्रशासनाकडून गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग विभागातून शेकडो जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे एसटीच्या प्रवाशांना ६० दिवस आधीपासून गणेशोत्सवासाठी ऑनलाइन आरक्षण सुविधा उपलब्ध केली होती. घरबसल्या मोबाइलवरून एसटीचे आरक्षण करणे प्रवाशांना सुलभ झाले. गौरी – गणपती विसर्जन…

Read More

रस्ता ओलांडताना अज्ञात दुचाकी स्वराने धडक दिल्याने आठ वर्षीय मुलगा जखमी…

कोलगाव येथील घटना: पोलीस घटनास्थळी दाखल ⚡सावंतवाडी ता.१२-: रस्ता ओलांडताना अज्ञात दुचाकी स्वाराने धडक दिल्याने आठ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. यावेळी गंभीर जखमी मुलाला नागरिकांनी धाव घेत त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान घटनास्थळी देखील पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.

Read More
You cannot copy content of this page