आरक्षण रद्द करणार म्हणणाऱ्या राहुल गांधी,आणि काँग्रेस चा खरा चहरा जनते समोर आला…

प्रभाकर सावंत: राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणासंदर्भातील विधानाचा सिंधुदुर्ग भाजपकडून केला जाहीर निषेध..

⚡सावंतवाडी ता.१३-: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणासंदर्भातील विधानाचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज इथे केली.दरम्यान देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे तोपर्यंत कोणीही आरक्षण या विषयाला हात लावू शकत नाही, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी यांनी व्यक्त केला. श्री सावंत आड सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचा सिंधुदुर्ग भाजप तर्फे जाहीर निषेध केला.

पुढे सावंत म्हणाले, अमेरिकेत बसलेले काँग्रेसचे राहुल गांधी हे जे जे बोललेले आहेत त्यांचा पूर्ण इंटरव्ह्यू जनतेने पाहिलेला आहे.त्यामुळे महाविकास आघाडी हे सत्तेत आल्यावर आरक्षण संपवून टाकणार आहेत आणी हे सत्य कोणीही पुसू शकत नाही असेही सावंत यावेळी बोलताना म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी भूमिका घेतली आहे त्यानुसार आम्हाला आरक्षण मिळेल अशी आमची धारणा आहे असेही ते म्हणाले

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजू परब जिल्हा चिटणीस महेश सारंग, आंबोली मंडल रवी मडगावकर बांदा मंडल महेश धुरी, सुहास गवंढळकर, प्रमोद गावडे, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, आधी यावेळी उपस्थित होते

You cannot copy content of this page