प्रभाकर सावंत:संघटना मजबूत असल्याने इथे इच्छुकांची संख्या अधिक..
⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपची संघटना मजबूत आहे त्यामुळे या मतदारसंघावर आम्ही आमचा दावा करणार आहोत आणि तसे आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मागणीही केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागांवर भाजपच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने प्रदेश कडून आम्हाला सुचित करण्यात आले आहे. मात्र पक्षश्रेष्ठी जे काही सांगतील त्यानुसार आम्ही सर्वजण काम करू असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज येथे स्पष्ट केले.दरम्यान
ते म्हणाले प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने काम करावे लागते त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप संघटना मजबूत असल्याने इथे इच्छुकांची संख्या ही अधिक आहे तिन्ही जागांवर आम्ही भाजपच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहोत निश्चितपणे आम्हाला अपेक्षित जागा मिळतील याची आम्हाला खात्री आहे आणि वरिष्ठांवर आमचा विश्वास आहे असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजू परब सरचिटणीस महेश सारंग रवींद्र मडगावकर महेश धुरी सुधीर दळवी सुहास गावंड ळकर. प्रमोद गावडे बाळू शिरसाट. संजय वीरनोडकर. मधुकर देसाई आदी उपस्थित होते
