Headlines

रेल्वे प्रवासादरम्यान महिलेचे २ लाख २३ हजारांचे सोन्याचे दागिने केले अज्ञात चोरट्याने लंपास…

वैभववाडी : रेल्वे प्रवास करणाऱ्या महिलेचे २ लाख २३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत. शुक्रवारी मुंबईकडे जाणाऱ्या सावंतवाडी दिवा पॅसेंजर गाडीत वैभववाडी रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. याबाबत गोविंद शंकर लाड रा. कुरंगावणे ता. कणकवली यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read More

सावंतवाडी वेंगुर्ला मुख्य मार्गावर जैतीर मंदिर नजीक मुंबईतला जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात…!

⚡वेंगुर्ले ता.१४-: तालुक्यातील तुळस येथे सावंतवाडी वेंगुर्ला मुख्य मार्गावर जैतीर मंदिर नजीक मुंबईतला जाणाऱ्या चाकरमान्याच्या खाजगी बसचा अपघात झाला या अपघातात बस मधील ८ प्रवाशी जखमी झाले. या जखमींना तात्काळ वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.आज १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी शिरोडा वरून मुंबईला जाणारी खाजगी बस तुळस येथे समोरील वाहनाला बाजू देताना भातशेतीत…

Read More

पोस्टात घडलेल्या चोरीत दोन अल्‍पवयीन मुलांचा सहभाग…

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने लावला छडा; मुद्देमाल जप्त करण्यात यश.. ⚡कणकवली ता.१४- : येथील पोस्ट कार्यालयातील संगणकाचे की बोर्ड, माऊस आणि स्कॅनर ही उपकरणे चोरीला गेली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने एका दिवसांत लावला. या चोरी प्रकरणात दोन अल्‍पवयीन मुलांचा सहभाग असल्‍याचे निष्पन्न झाले आहे. त्या दोन्ही विधिसंघर्ष बालकांकडून चोरी केलेला मुद्देमाल…

Read More

ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरे पंचक्रोशीचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार २०२४’ लक्ष्मणराव आचरेकर यांना जाहीर…!

मालवण दि प्रतिनिधीज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरा पंचक्रोशीचा २०२४ चा मानाचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार आचरे बौद्धवाडी येथील लक्ष्मणराव भिवा आचरेकर यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री देव रामेश्वर मंदिर आचरे येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक…

Read More

लहान मुलांसाठी मोफत आरोग्य शिबीर…

⚡मालवण ता.१४-: रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी डॉ सिद्धू सकपाळ हार्मोनि मेडिकेअरत्रिंबक टेम्ब बाजार येथे दुपारी 2 ते 5 या वेळेत लहान मुलांकरिता मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात बालरोगतज्ञ् येऊन मुलांची तपासणी करणार आहेत.तसेच या शिबिरात लहान मुलांचे आयुषमान कार्ड , महात्मा फुले योजना यांची नोंदणी करून घेतली जाणार आहे व…

Read More

नाद पियाळी नदीकिनारी आढळला वृद्धाचा सडलेला स्थितीत मृतदेह…

देवगड : प्रतिनिधी १४ सप्टेंबर २४ कणकवली तालुक्यातील दोन महिन्यापुर्वी असलदे दिवाण सानेवाडी येथून बेपत्ता झालेल्या धाकू लक्ष्मण मयेकर(७५) या वृध्दाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा.सुमारास नाद पंखेवाडी येथील पियाळी नदीच्या किनाऱ्यावर आढळला.

Read More

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन…

⚡कुडाळ ता.१४-: राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग राजाच्या चरणी नतमस्तक होऊन सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले तसेच खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समवेत आडेली येथील हिरकणी वारकरी महिला भजन मंडळाचे भजन पाहिले.

Read More

खास. नारायण राणे यांनी सपत्नीक घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन…

⚡कुडाळ ता.१४-: कुडाळ भाजप कार्यालय येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व सौ नीलमताई राणे यांनी घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे उपस्थित होते.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला सुखी समृद्धी आणि त्यांची भरभराट होऊ अशी मागणी गणरायासमोर खासदार नारायण राणे यांनी तसेच यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने…

Read More

सावंतवाडी शिवसेना पक्षाच्यावतीने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा केला निषेध…!

सावंतवाडी : शिवसेना पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून दिलेल्या राज्यव्यापी आदेशाप्रमाणे सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोर शिवसेना पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. राहुल गांधी यांनी परदेशात जावून आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या संविधान विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, संविधान बचाव राहुल गांधी यांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना…

Read More

खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथील मूळ गावी गणपती बाप्पाचे घेतले सपत्नीक दर्शन…!

कणकवली : माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार ना. नारायण राणे यांनी आपल्या कणकवली तालुक्यातील वरवडे वरवडे येथील मूळ घरातील गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. कणकवली तालुक्यातील वरवडे गावात खासदार नारायण राणे यांचे मूळ घर आहे. यावेळी राणे दांपत्याने घरच्या गणपतीची आरती करत मनोभावे पूजा केली. यावेळी बोलताना खासदार नारायण राणेंनी आपण दरवर्षी घरच्या…

Read More
You cannot copy content of this page