स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने लावला छडा; मुद्देमाल जप्त करण्यात यश..
⚡कणकवली ता.१४- : येथील पोस्ट कार्यालयातील संगणकाचे की बोर्ड, माऊस आणि स्कॅनर ही उपकरणे चोरीला गेली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने एका दिवसांत लावला. या चोरी प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या दोन्ही विधिसंघर्ष बालकांकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कणकवली पोलीस करत आहेत.
