कट्टा महात्मागांधी तंटामुक्त गाव सामिती अध्यक्षपदी दयानंद शेडगे यांची पुन्हा बिनविरोध निवड…

⚡देवगड ता.१२-:
देवगड तालुक्यातील कट्टा गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी श्री दयानंद लवू शेडगे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करणेत आली.

कट्टा ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली या ग्रामसभेत त्यांची बिनविरोध सर्वानुमती निवड करण्यात आली.यावेळी सरपंच श्रीम. श्वेता कोयंडे, ग्रामसेविका श्रद्धा वळंजू, ऊपसरपंच गणेश करंगुटकर
सदस्या सौ तेजस्विनी शेडगे,
सौ स्वरा करंगुटकर,सौ प्रतिक्षा शेडगे,सौ मनाली मेकर, सदस्य श्री जगन्नाथ कोयंडे,श्री रामचंद्र
कोयंडे ,पोलीस पाटील देशपांडे मॅडम कर्मचारी वृंद व सन्मानिय ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन तुंटामुक्त समितीचे अध्यक्ष दयानंद शेडगे यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी शेडगे यांनी मागील कालावधीत आलेल्या तंट्यांचे योग प्रकारे निवारण करून गावात विविध ऊपक्रमाद्वारे एकतेचे व शांततेचे वातावरण निर्माण केले होते.त्याचप्रमाणे एक कलाकार, भजनी बुवा, गायन, वादक यांची आवड व कलागुन असलेले तसेच ग्रामीण विकास या विषयाचे पदव्यूत्तर शिक्षण घेतलेले एक नि:ष्पक्ष अभ्यासु व्यक्तिमत्त्व अध्यक्ष म्हणुन लाभले त्यामुळे गावात सर्वत्र समाधान व्यक्त करणेत येत आहे. भविष्यात
कट्टा गावचा सर्वांगीन विकास व्हायचा असेल तर दयानंद शेडगे यांसारखे ग्रामीण विकास विषयाची पदव्युत्तर डिग्री घेतलेले हुशार व्यक्तीमत्व सरपंचपदी असणे गरजेचे असल्याचे मत गावातील जाणकार मंडळींनी यावेळी व्यक्त केले.
यादरम्यान शेडगे म्हणाले कि, सरपंचपदी संधी मिळाली तर पाण्याची जठील समस्या, वाडीवाडीना मधुन जोडणारे रस्ते, प्रत्येक घराच्या अंगणासमोरून रिक्षा जाईल एवढा रस्ता, तसेच कट्टा कालवी कलम बागातुन जोडणारा रस्ता जेणे करून आंबा वहातुक व रस्ता लगत जमिनी डेव्हलप होतील. तसेच गावात छोटेमोठे लघु उद्योग निर्माण करून गावचा सर्वांगीन विकास करण्याचा निर्धार शेडगे यांनी व्यक्त करून उपस्थित सर्वाचे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page