पाच दिवसाच्या गणपती बाप्पांना मालवणात भक्तिमय वातावरणात निरोप…

⚡मालवण ता.११-: गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या, एक,दोन, तीन, चार…गणपतीचा जयजयकार अशा घोषणा आणि साथीला वाद्यांचा गजर तसेच फटाक्यांची आतिषबाजीत आज बुधवारी पाच दिवसाच्या गणपती बाप्पांना मालवणात भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.

कोकणचा महाउत्सव म्हणून ओळखल्या जाणऱ्या गणेशोत्सवाच्या आजच्या पाचव्या दिवशी सायंकाळी प्रथे परंपरे नुसार गणेशमूर्ती विसर्जनास सुरुवात झाली. विसर्जन ठिकाणी नगर पालिका, ग्रामपंचायत प्रशासनाने सुलभ मूर्ती विसर्जनसाठी सुविधा दिल्या होत्या तर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

समुद्र किनारे, नदी, तलाव, वहाळ, गणेशघाट आदी ठिकाणी प्रथेप्रमाणे बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन ठिकाणी विसर्जन सोहळा पाहण्यासाठीही भाविकांची उपस्थिती दिसून येत होती.

You cannot copy content of this page