⚡मालवण ता.११-: मालवण शहरातील वाढत्या कचरा समस्येवर नियोजन करून कचऱ्याचा निपटारा करण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेणे व अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणारे स्वच्छता निरीक्षक हे पद गेली दहा वर्षे रिक्त आहे त्यामुळे कचऱ्याची समस्या बिकट झाली आहे म्हणूनच मालवण नगरपालिकेला कायमस्वरूपी स्वच्छता निरीक्षक पद मिळावे अशी मागणी मालवणचे सामाजिक कार्यकर्ते श्री सौरभ ताम्हणकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे नेते निलेश राणे, मुख्याधिकारी यांच्याकडे श्री. ताम्हणकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मालवण नगरपालिकेला संजय पवार हे स्वच्छता निरीक्षक उपलब्ध झाले आहेत. याबद्दल श्री. ताम्हणकर यांनी
आभार व्यक्त केले आहेत
दरम्यान, स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांच्या नियुक्तीमुळे मालवण शहरातील स्वच्छतेच्या समस्या दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मालवण शहरातील विविध समस्यांबाबत सौरभ ताम्हणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठक निमित्त उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर करत मालवण नगरपरिषदेत गेले १० वर्ष रिक्त असलेले स्वच्छता निरीक्षक हे पद त्वरित भरण्याची मागणी केली होती. तसेच भाजपचे नेते निलेश राणे आणि मुख्याधिकाऱ्यांचे देखील निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले होते. याबाबत त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ही नियुक्ती झाल्याने सौरभ ताम्हणकर यांनी आभार मानले आहेत.
