⚡ओरोस, ता. ६-: भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंती स्मरण पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग आणि भाजपा ओरोस मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भाजपा जिल्हा कार्यालय, ओरोस येथे कार्यकर्ता संमेलन व रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात ५० हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रभाकर सावंत यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत समाजहितासाठी अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रहितासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा वारसा समाजोपयोगी उपक्रमांतून जपणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अनिल सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश (छोटू) पारकर, ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद सावंत, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, पंचायत समिती सदस्य अमित भोगले यांच्यासह नितीन महाडेश्वर, लॉरेन्स मान्येकर, मनीष पारकर, पप्या तवटे, दिनेश जैतापकर, आबा मुंज, कीर्तीकुमार तेरसे, विकास राऊळ, संजय लाड, आदेश नाईक, सुनील जाधव, सुशील निब्रे, गोपाल हरमलकर, सिद्धेश आगणे, शुभम परब, संतोष वालावलकर, दशरथ बापर्डेकर, आशु सावंत तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त भाजपाचे कार्यकर्ता संमेलन; ओरोसमध्ये ५० हून अधिक जणांचे रक्तदान…
