⚡मालवण ता.०६-:
गेले तीन दिवस खंडित वीज पुरवठ्यामुळे संतापलेल्या वायंगणीवासियांनी आचरा सबस्टेशन येथील वीज कार्यालयावर धडक देत तातडीने वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचाइशारा लेखी निवेदनाद्वारे सहाय्यक अभियंता शिंदे यांना दिला.
यावेळी वायंगणी सरपंच रुपेश पाटकर,चंदू सावंत, रमाकांत नाईक, सुधाकर वायंगणकर, गणेश धुळे,अमित खोत,संजय धुळे,लवू पेडणेकर, दिनेश पेडणेकर, दामोदर वायंगणकर,यांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
वायंगणी गावात रोजच्या वीजेच्या खेळ खंडोबा सोबत गेले तीन दिवस वीज पुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत वायरमन यांना विचारणा केल्यास वायरमन उद्धट उत्तरे देत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे संतप्त वायंगणी ग्रामस्थांनी सोमवारी आचरा वीज वितरण कार्यालयावर धडक देत वीज वितरण अधिका-यांना धारेवर धरले.सरपंच रुपेश पाटकर,चंदू कदम, रमाकांत नाईक, वायंगणकर, खोत आदींनी विद्यूत मंडळ अभियंत्यांना धारेवर धरत विद्यूत समस्येचा पाढाच वाचला लाईनवरची झाडे वेळीच तोडली असती तर लाईट समस्या उद्भवल्या नसत्यालाईनमन यांना आवश्यक साहित्य उपलब्ध होत नसल्याने दुरुस्तीची कामे रखडली आहेत बौद्धवाडी येथील मुख्य लाईनचा पोलच गंजून गेल्याने धोकादायक बनला आहे.कधीही तुटून अपघात होण्याची शक्यता आहे . याबाबत उपस्थित सहाय्यक अभियंता यांनी वीज समस्या निवारण्यासाठी ग्रामस्थांसोबत पहाणी करून वीज पुरवठा सुरळीत करतो असे आश्वासन दिल्यावर संतप्त ग्रामस्थांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले.तसेच तातडीने वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयासमोरच उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
यावेळी ग्रामस्थांचा उद्रेक होऊ नये म्हणून आचरा पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी हेमंत पेडणेकर, ठाकरे उपस्थित झाले होते.
