दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला जलमार्गावरील वाहतूक परवानगीची स्थगिती न उठविल्यास उपोषण छेडणार…
⚡मालवण ता.२८-:मालवण दांडी येथील श्री दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी असलेल्या व्यवसायिकांना बोटीतील चढउताराचे व सुरक्षिततेचे कारण देऊन प्रवासी वाहतूक करण्याबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाने नोव्हेंबर २०२२ मध्ये स्थागिती दिली होती. मात्र याच जलमार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी दांडेश्वर मंदिरासमोरील समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्र सागरी मंडळाकडून तरंगती जेटी उभारून उभारून दोन महिने उलटले…
